परभणीतील १६ प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात

करपरा प्रकल्प
करपरा प्रकल्प
परभणी : जिल्ह्यातील एक मोठा, एक मध्यम आणि १४ लघू अशा एकूण १६ प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा संपला आहे. विहिरी, बोअर आटल्यामुळे अनेक गावे, वाड्या, वस्त्या, तांड्यावरील ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरची संख्या १६ पर्यंत पोचली आहे.
 
रविवारी (ता. १५) येलदरी प्रकल्पात एकूण १२२.९७० दलघमी म्हणजेच मृत पाणीसाठा शिल्लक होता. सिद्धेश्वर धरणातील एकूण १७७.२२० दलघमी पाणीसाठ्यापैकी ७.३३ दलघमी (९.०५टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता. निम्न दुधना धरणांमध्ये एकूण २०२.१७० दलघमी पैकी ९९.५७० दलघमी (४१.११ टक्के )उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. दोन मध्यम प्रकल्पांपैकी मासोळी (ता.गंगाखेड) धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपला असून करपरा (ता.जिंतूर) मध्यम प्रकल्पात एकूण ९.२१३ दलघमी पैकी ५.२३३ दलघमी (२१टक्के ) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.
 
२२ लघू सिंचन तलावांपैकी टाकळवाडी, जोगवाडा, बेलखेडा, चिंचोली, आडगाव, दहेगाव हे सहा तलाव कोरडे पडले आहेत. नखातवाडी, तांदूळवाडी, कोद्री, देवगाव, वडाळी, केहाळ, भोसी, चारठाणा या अाठ तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. सद्यस्थितीत ८ लघू तलावांमध्ये उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
 
झरी (ता. पाथरी) तलावामध्ये जायकवाडी डाव्या कालव्याचे पाणी सोडण्यात आल्यामुळे उपयुक्त पाणीसाठ्यामध्ये ८० टक्क्यांपर्यंत वाढ झाली अन्य तलावांपैकी पेडगाव तलावामध्ये १०, आंबेगावमध्ये ८, राणीसावरगावमध्ये १, पिंपळदरीमध्ये ९, कवडामध्ये १०, मांडवीमध्ये ५, पाडाळीमध्ये ३५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.
 
पालम तालुक्यातील रामापूर तांडा, नाव्हा, चाटोरी, आनंदवाडी या चार गावांना सहा टॅंकरने, पूर्णा तालुक्यातील पिंपळा लोखंडे, हिवरा, वाई लासीना, लोण खुर्द या चार गांवाना चार टॅंकरने गंगाखेड तालुक्यातील खंडाळी, हिवरा, ईळेगाव, गुंडेवाडी, उमरानाईक तांडा या ठिकाणी पाच टॅंकरने आणि जिंतूर तालुक्यातील मांडवा एक टॅंकरने असे एकूण चार तालुक्यात १६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. 

पाणीटंचाईवरील उपाययोजना अंतर्गत पूर्णा, पालम, गंगाखेड, पाथरी, सेलू, जिंतूर, मानवत या सात तालुक्यांमध्ये ५५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. १२३ विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. ३८ नळ योजनांची विशेष दुरुस्ती कामे, ५ तात्पुरत्या पूरक नळ योजना, १५ नवीन विंधन विहिरी असे टंचाई निवाणार्थ करावयाच्या उपाय योजनांतर्गत १ कोटी २२ लाख १७ हजार रुपये खर्चाच्या कामांना मंजुरी देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com