पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीत वाढ

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात क्षेत्रामध्ये सातत्याने पावसाची रिपरिप सुरूच आहे. यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक होत असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. जिल्ह्यातील धरणांची एकूण क्षमता २१६.८४ टीएमसी असून, सोमवारी (ता.२२) सकाळी आठ वाजेपर्यंत उजनीसह जिल्ह्यातील २५ धरणांमध्ये मिळून सुमारे १३१ टीएमसी (सुमारे ६० टक्के) पाणीसाठा झाला होता.

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर तसेच पूर्व उतारावरील डाेंगराळ भागात पावसाच्या सरीवर सरी येत असल्याने झरे, ओढे, नाले, नद्यांना पाणी आले आहे. पश्‍चिम भागात असलेल्या धरणांतील पाणीपातळीत सातत्याने वाढ सुरू आहे. काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने उजनी, आणि घोड धरणाची पाणीपातळी उपयुक्त साठ्यात आली आहे. उजनी धरणामध्ये १०.५० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून, अचल पातळीसह उजनीमध्ये तब्बल ७४ टीएमसीहून अधिक पाणीसाठा झाला आहे.

जिल्ह्यातील खडकवासला आणि कलमोडी धरण पूर्णपणे भरले अाहे. येडगाव, चासकमान, वडिवळे, आंद्रा, पवना, कासारसाई, मुळशी, पानशेत आणि वीर धरणात ८० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. रविवारी चासकमान व खडकवासला धरणाच्या कालवा आणि सांडव्यातून प्रत्येकी सहा हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत होते. वडज, कलमोडी, वडिवळे, कासारसाई आणि गुंजवणी धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू होता. पुण्यातील बंडगार्डन येथे सुमारे साडेआठ हजार तर दौंड येथे भिमा नदीत सहा हजार क्युसेक वेगाने पाणी वाहत असल्याचे पुणे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com