Agriculture news in Marathi Dam water planning started in Kolhapur | Agrowon

कोल्हापुरात धरणाच्या पाण्याचे नियोजन सुरू

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

कोल्हापूर : पावसाळ्याच्या तयारीसाठी पाटबंधारे विभागाच्या वतीने धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन युद्धपातळीवर सुरू आहे. राधानगरी धरणाच्या मुख्य दरवाजातून पाणी सोडणे सुरू करण्यात आले आहे. याचा फायदा भोगावती व पंचगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांना होणार आहे पाणी सोडण्यात येत असल्याने दोन्ही नद्यांची पाणीपातळी समाधानकारक राहण्याची शक्‍यता आहे.

कोल्हापूर : पावसाळ्याच्या तयारीसाठी पाटबंधारे विभागाच्या वतीने धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन युद्धपातळीवर सुरू आहे. राधानगरी धरणाच्या मुख्य दरवाजातून पाणी सोडणे सुरू करण्यात आले आहे. याचा फायदा भोगावती व पंचगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांना होणार आहे पाणी सोडण्यात येत असल्याने दोन्ही नद्यांची पाणीपातळी समाधानकारक राहण्याची शक्‍यता आहे.

प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या अंतिम सप्ताहामध्ये पाणी सोडण्याचे नियोजन केले जाते. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत बहुतांशी धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. हवामान विभागाने यंदा जादा पावसाची शक्यता वर्तवली आहे. हे गृहीत धरून पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे.

जुलै नंतर पाऊस सुरू होत असल्याने किमान दोन महिने तरी शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी नद्या प्रवाहित ठेवण्याचे नियोजन आहे. यानुसार पाणी सोडले जात आहे. शाहुवाडी व शिराळा तालुक्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या चांदोली धरणात सध्या १४ टीएमसी पाणीसाठा असून यातील उपयुक्त पाणीसाठा ७ टीएमसी आहे.

गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा २.३ टीएमसीने अधिक आहे. गेल्या सहा महिन्यांत सात टीएमसी पाण्याचा वापर झाला होता. तर फेब्रुवारी व मार्च महिन्यात आठ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. सध्या धरणातून सोळाशे क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुढील एका महिन्यात किमान सहा टीएमसी पाण्याचा वापर होण्याची शक्यता पाटबंधारे विभागाची आहे.


इतर बातम्या
माया आणि छायेची पालवी पुन्हा फुलणार... नाशिक : हल्ली विकासकामांच्या नावाखाली मोठ्या...
नगर जिल्ह्यात ‘निसर्ग'चा शेतीपिकांना...नगर : कोकण आणि मुंबईला तडाखा देणारे निसर्ग...
दापोली, मंडणगडमध्ये बागांना फटकारत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा...
सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी...
पुणे जिल्ह्यात ‘निसर्ग’चे थैमान पुणे : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी (ता.३)...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत फळबागांना...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
नाशिक जिल्ह्यात चक्रीवादळामुळे...नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात दुपारनंतर...
मॉन्सूनने कर्नाटक किनारपट्टी व्यापली;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘निसर्ग’चा शेतीला मोठा तडाखापुणेः निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याला वादळी...
कापसाची ३७१ लाख क्विंटल खरेदीनागपूर ः राज्यात आतापर्यंत कापसाची हमीभावाने ३७१....
पुणे जिल्ह्यात पॉलिहाऊसचे मोठे नुकसानपुणेः कोरोना टाळेबंदीमध्ये बाजार समित्यांसह...
कापूस नोंदणीला उद्यापर्यंत मुदतवाढअमरावती ः शासकीय हमीभाव योजनेअंतर्गंत कापूस...
राज्यात गुरांचे बाजार सुरु करण्याचे आदेशअकोला ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने...
संकटाच्या मालिका सोसून द्राक्ष हंगामाची...नाशिक: यंदा जिल्ह्यातील द्राक्ष हंगामावर सतत...
लॉकडाउनमध्ये गजबजली ई-चावडीपुणे: शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात...
मॉन्सून कर्नाटकात दाखल, कारवार,...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...