agriculture news in marathi, dam water storage level status, marathwada,maharashtra | Agrowon

मराठवाड्यातील लघू प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा १७ टक्‍क्‍यांवर
टीम अॅग्रोवन
रविवार, 1 एप्रिल 2018
औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांना मोठी ओहोटी लागली आहे. ७४६ लघू प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा १७ टक्‍क्‍यांवर आला आहे. अनेक लघू प्रकल्प कोरडे पडले आहेत. ७५ मध्यम प्रकल्पांमध्येही केवळ २८ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक असल्याचे चित्र आहे. 
 
मराठवाड्यातील मोठ्या अकरा प्रकल्पांमध्ये मार्चअखेर ३२ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. दुसरीकडे ७५ मध्यम प्रकल्पात २८, गोदावरी नदीवरील ११ बंधाऱ्यांमध्ये ३४, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २४ बंधाऱ्यांमध्ये केवळ १५ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.
 
औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांना मोठी ओहोटी लागली आहे. ७४६ लघू प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा १७ टक्‍क्‍यांवर आला आहे. अनेक लघू प्रकल्प कोरडे पडले आहेत. ७५ मध्यम प्रकल्पांमध्येही केवळ २८ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक असल्याचे चित्र आहे. 
 
मराठवाड्यातील मोठ्या अकरा प्रकल्पांमध्ये मार्चअखेर ३२ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. दुसरीकडे ७५ मध्यम प्रकल्पात २८, गोदावरी नदीवरील ११ बंधाऱ्यांमध्ये ३४, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २४ बंधाऱ्यांमध्ये केवळ १५ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.
 
लघू प्रकल्पांबाबत सर्वाधिक चिंताजनक स्थिती औरंगाबाद, परभणी, हिंगोली जिल्ह्यांची आहे. हिंगोली जिल्ह्यातील २७ लघू प्रकल्पात केवळ ७ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक असून, परभणी जिल्ह्यातील २२ लघू प्रकल्पात ९, तर औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ लघू प्रकल्पात केवळ १२ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.
 
जालना जिल्ह्यातींल लघू प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची स्थिती फारशी समाधानकारक नाही. जालना जिल्ह्यातील ५७ लघू प्रकल्पातही १२ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा आहे. नांदेड जिल्ह्यातील ८८ लघू प्रकल्पात १५, बीडमधील १२६ प्रकल्पांत २१, लातूरमधील १३२ प्रकल्पांत २१, उस्मानाबादमधील २०१ लघू प्रकल्पात १५ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. 
 
मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ २८ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये सर्वाधिक चिंताजनक स्थिती औरंगाबाद जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठ्याची आहे.
औरंगाबादमधील १६ मध्यम प्रकल्पांत ५ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापाठोपाठ परभणीतील २ प्रकल्पांत १४, जालन्यातील ७ प्रकल्पांत २५, नांदेडमधील ९ प्रकल्पांत ३०, लातूरमधील ८ प्रकल्पांत ३२, उस्मानाबादमधील १७ प्रकल्पांत ४२, तर बीड जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पात ४५ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली. 
 
मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी दहा मध्यम प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा संपुष्टात आला आहे. यामध्ये सर्वाधिक ९ मध्यम प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यातील असून, त्यापाठोपाठ नांदेड व बीड जिल्ह्यांतील प्रत्येकी एका प्रकल्पाचा यात समावेश आहे. 
 
मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा ३३ टक्‍क्‍यांवर आला आहे. परभणी जिल्ह्यातील येलदरी या मोठ्या प्रकल्पात उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक नाही. दुसरीकडे ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठाही ३ टक्‍क्‍यांवर आला आहे.
 
अनेक वर्षांनंतर गेल्या पावसाळ्यात पहिल्यांदाच तुडुंब झालेल्या जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठाही मोठ्या प्रमाणात घटून ५३ टक्‍क्‍यांवर आला आहे. निम्न मनार, विष्णुपुरी या दोन मोठ्या प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठ्याची स्थितीही फारशी समाधानकारक नाही. 

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...