पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघे २२ टक्के पाणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे   : उन्हाच्या झळांमुळे बाष्पीभवनात झालेली वाढ आणि पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणी झपाट्याने कमी होत आहे. उजनीसह जिल्ह्यातील टेमघर, नाझरे, घोड ही धरणेदेखील अचल पातळीत गेली आहेत. उर्वरित सर्व धरणांमध्ये शनिवारपर्यंत (ता. ३०) ४८.०५ टीएमसी म्हणजे २२ टक्के चल पाणीसाठा शिल्लक असल्याचे पुणे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले. 

उजनीसह पुणे जिल्ह्यातील सर्व २५ धरणांंची चल (उपयुक्त) पाणीसाठ्याची क्षमता २१६.८४ टीएमसी आहे. यापैकी मार्च महिन्याच्या अखेरीस अवघे ४८ टक्के पाणी शिल्लक आहे. उजनी धरणाचा पाणीसाठा उणे १७ टक्के, म्हणजेच अचल पातळीतील पाणीसाठा ९ टीएमसीने कमी झाला आहे. धरणाच्या अचल पातळीत ५४.३३ टीएमसी पाणी शिल्लक आहे. पुढील काळात पाणीटंचाई वाढण्याची शक्यता असल्याने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत बरेचसे पाणी शिल्लक ठेवावे लागणार आहे. परिणामी, शेतीच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न उभा राहणार आहे. 

कुकडीच्या खोऱ्यातील घोड, मुळा खोऱ्यातील टेमघर, निरा खोऱ्यातील नाझरे ही धरणे मृतसाठा पातळीत गेली आहेत. येडगाव, पिंपळगाव, वडज, कलमोडी, वडिवळे, कासारसाई या धरणांमधील पाणीसाठा तळाशी गेला आहे. धरणांमधील शिल्लक पाणीसाठा विचारात घेता भाटघरमध्ये ९.०७ टीएमसी, मुळशीत ५.८७ टीएमसी, वीरमध्ये ४.६९ टीएमसी, वरसगाव, पानशेत धरणांमध्ये ४ टीएमसी, नीरा देवघर, पवना धरणात साधारणत: तीन टीएमसी, तर उर्वरित सर्वच मोठ्या धरणांमध्ये तीन टीएमसीपेक्षा कमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने उपलब्ध जलसाठ्यातून पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्याचे काळजीपूर्वक नियोजन करावे लागणार आहे. 

शनिवारी (ता. ३०) जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा (टीएमसीमध्ये) कंसात टक्केवारी : वरसगाव ४.१६(३२), पानशेत ४.६३ (४३), खडकवासला १.०३ (५२), पवना ३.४१ (४०), कासारसाई ०.२३ (४१), मुळशी ५.८७ (३२), कलमोडी ०.३२ (२१), चासकमान १.३४ (१८), भामा आसखेड २.३० (३०), आंद्रा १.९७ (६८), वडीवळे ०.५९ (५५), गुंजवणी १.१९ (३२), भाटघर ९.०७ (३९), नीरा देवघर २.९९ (२६), वीर ४.६९ (५०), माणिकडोह १.०२ (१०), पिंपळगाव जोगे ०.२८ (७), येडगाव ०.३२ (११), वडज ०.११ (१०), डिंभे २.५२ (२०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com