agriculture news in marathi, dam water storage status, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यातील धरणे तळाशी
टीम अॅग्रोवन
रविवार, 19 मे 2019

पुणे  : जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने खालावत आहे. पवना, मुळशी, पानशेत या धरणांमध्ये २ टीएमसीपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. तर उर्वरित जवळपास सर्वच धरणे तळाशी गेली आहेत. कुकडी प्रकल्पातील पिंपळगाव जोगे, वडज, डिंभे, घोड ही धरणे अचल पातळीत पोचली आहेत. खडकवासला प्रकल्पातील टेमघर धरण कोरडे पडले असून, नाझरे धरणातही अत्यल्प पाणीसाठा आहे, अशी माहिती पुणे पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आली. 

पुणे  : जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने खालावत आहे. पवना, मुळशी, पानशेत या धरणांमध्ये २ टीएमसीपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. तर उर्वरित जवळपास सर्वच धरणे तळाशी गेली आहेत. कुकडी प्रकल्पातील पिंपळगाव जोगे, वडज, डिंभे, घोड ही धरणे अचल पातळीत पोचली आहेत. खडकवासला प्रकल्पातील टेमघर धरण कोरडे पडले असून, नाझरे धरणातही अत्यल्प पाणीसाठा आहे, अशी माहिती पुणे पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आली. 

उजनीसह पुणे जिल्ह्यातील सर्व २५ धरणांंची चल (उपयुक्त) पाणीसाठ्याची क्षमता २१६.८४ टीएमसी आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये शनिवारपर्यंत (ता. १८) १५.६३ टीएमसी म्हणजे ७ टक्के चल पाणीसाठा शिल्लक होता. उजनी धरणाचा पाणीसाठा उणे ४१ टक्क्यांवर पोचला असून, धरणाच्या अचल पातळीतील पाणसाठा २१.९१ टीएमसीने कमी झाला आहे. धरणाच्या अचल पातळीत ४३.७१ टीएमसी पाणी शिल्लक आहे. शेती आणि पिण्यासाठी पाणी सोडावे लागल्याने, वाढत्या उन्हामुळे होणाऱ्या बाष्पीभवनामुळे धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. यातच पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत बरेचसे पाणी शिल्लक ठेवावे लागणार असून, शेतीसाठी पाणी देता येणार नाही.  

खडकवासला प्रकल्पातील टेमघर धरण पूर्णपणे कोरडे झाले असून, उर्वरित तीन धरणांत मिळून ६.४४ टीएमसी म्हणजेच २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच वेळी सर्व धरणांत मिळून ४.४३ टीएमसी (१५ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. पवना, मुळशी, पानशेत धरणांत २ टीएमसीपेक्षा जास्त, तर भाटघर, वरसगाव आणि आंध्रा धरणामध्ये १ टीएमसी पाणीसाठा आहे. तर उर्वरित सर्वच धरणांमध्ये अर्धा ते एक टीएमसीपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. मॉन्सूनच्या आगमनास उशीर होणार असल्याने उर्वरित जलसाठ्यातून पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.

शनिवारी (ता. १८) जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये) कंसात टक्केवारी : वरसगाव १.४१(११), पानशेत २.४३ (२३), खडकवासला ०.५९ (३०), पवना २.०२ (२४), कासारसाई ०.१४ (२४), मुळशी २.२५ (१२), कलमोडी ०.२७ (१८), चासकमान ०.३१ (४), भामा आसखेड ०.७२ (९), आंद्रा १.३४ (४६), वडीवळे ०.४३ (४०), गुंजवणी ०.६६ (१८), भाटघर १.७० (७), नीरा देवघर ०.३७ (३), वीर ०.६४ (७), माणिकडोह ०.१५ (१), येडगाव ०.१२ (४). 

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलाच्या अभ्यासासाठी नियामक मंडळ...मुंबई : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या...
शेतकऱ्यांना अनुदानावर सेफ्टी किटचा...यवतमाळ  ः दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...
राष्ट्रीय पशू वाहतूक बंदीचा आर्थिक फटका...इंग्लंडमध्ये लाळ्या खुरकुत (एफएमडी), बोव्हाईन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन डोंगर...सिंधुदुर्ग : अतिवृष्टीने खचलेल्या डोंगरांपैकी...
कॉंग्रेसच्या आजपासून ‘महापर्दाफाश' सभा...मुंबईः संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि...
जानकर साहेबांची ताकत चौकात नाही; शिवाजी...मुंबई : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत ...
ड्रायझोनमधील वरुडला ठिबक अनुदानातून...अमरावती  ः सर्वाधिक संत्रा लागवड व...
जलसमस्येवरील उपायांच्या प्रयत्नात...औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्यात निर्माण होणाऱ्या...
नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
देवळा तालुक्यातील ‘त्या’...नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात...
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज...सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय...
देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान...नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या...
साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन...सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित...
नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती...नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची...
...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती...नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर...