Agriculture news in Marathi, Damage to 11 thousand hectares of paddy, nagley crops | Agrowon

भात, नागली पिकांचे ११ हजार हेक्टरवर नुकसान

टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

रत्नागिरी ः क्यार वादळाच्या प्रभावामुळे झालेल्या अतिवृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यातील भात, नागली पिकांच्या नुकसानीचा आकडा २६ कोटी ७५ लाखावर पोचला आहे. ७९ हजार १४५ हेक्टरपैकी ११ हजार ७०६ हेक्टरचे नुकसान झाले आहे, अशी माहिती प्रशासनाकडे सादर केलेल्या नुकसानीच्या पंचनाम्यातून मिळाली. 

रत्नागिरी ः क्यार वादळाच्या प्रभावामुळे झालेल्या अतिवृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यातील भात, नागली पिकांच्या नुकसानीचा आकडा २६ कोटी ७५ लाखावर पोचला आहे. ७९ हजार १४५ हेक्टरपैकी ११ हजार ७०६ हेक्टरचे नुकसान झाले आहे, अशी माहिती प्रशासनाकडे सादर केलेल्या नुकसानीच्या पंचनाम्यातून मिळाली. 

क्यार वादळमुळे सलग दहा दिवस कोकण किनारपट्टीसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला. गरवे, निमगरव्याची कापणी रखडल्यामुळे भातकापणी अतिवृष्टीत सापडली. भात भिजल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाकडून दिलेल्या आकडेवारीवरून ५३ हजार ९३७ शेतकऱ्यांचे ११ हजार ७०६ हेक्टरचे नुकसान झाले आहे. पंचनामे पूर्ण झाले असून शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला आहे. प्राप्त अहवालानुसार काढणीपश्‍चात नुकसान झालेले शेतकरी १५,९८० इतके आहेत. त्यांच्या ३,२३० हेक्टरचे नुकसान झाले असून ३७,९५७ शेतकऱ्यांच्या मळ्यातील उभ्या पिकांना फटका बसला ते क्षेत्र ८,४७५ हेक्टर आहे. 

पंचनामे पूर्ण झालेल्या क्षेत्रापैकी विमासंरक्षित ३०५ शेतकऱ्यांच्या १४०.८५ हेक्टरची नोंद झाली आहे. पावसामुळे भातशेतीसोबत पेंढ्याचेही नुकसान झाले आहे. अचानक पडलेल्या पावसामुळे शेतातील कापलेले भात ओले होऊन कुजले. काही ठिकाणच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने शेतात पाणी साचून राहिले असल्याने भाताचा पेंढाही कुजला. मळणीसाठी तयार केलेल्या उडव्यांमध्ये पाणी शिरल्याने तोही पेंढा कुजला आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून हातच्या पिकाचे नुकसान होण्याबरोबरच पेंढ्याचेही नुकसान होत असल्याने गुरांवर उपासमारीची वेळ येणार आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
पदोन्नती प्रकरणात ‘पंदेकृवि’ने काढले...अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
महात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून...नगर  ः कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...
महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांमध्ये `कोरोना`...पुणे : निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला जेमतेम २८...
केळी पिकवून विकण्यासाठी अखेर...परभणी : ‘लॅाकडाऊन’मुळे केळीच्या दरात मोठी घसरण...
कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी (ता.५) सायंकाळी...
जनावरांतील उष्माघाताचे नियंत्रणउन्हाच्या संपर्कात आल्यामुळे जनावरांच्या शरीराचे...
अकोल्यात भाजीपाला, फळविक्रीची ११०...अकोला ः सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यातील...
‘वीज दर कपातीत शेतकऱ्यांवरील अन्याय दूर...अकोला ः राज्य वीज नियामक आयोगाने नुकतीच उद्योग,...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात फुले...नांदेड : ‘लॅाकडाऊन’मुळे नांदेडसह अन्य ठिकाणच्या...
फूल विक्रीचा व्यवसाय डबघाईस; फेकून...शिरपूरजैन, जि. वाशीम : येथील फूल उत्पादक शेतकरी...
बेदाणा निर्मितीसाठी आवश्यक रसायने...नाशिक : द्राक्षापासून बेदाणा निर्मितीसाठी...
नाशिक जिल्ह्यात बेदाणा निर्मितीच्या...नाशिक : ऐन द्राक्ष हंगामाच्या अंतिम टप्प्यात...
मराठवाड्यात फळे, भाजीपाल्याची ८१ हजार...औरंगाबाद : एकीकडे दररोज सकाळीच भरणाऱ्या किरकोळ...
माळीनगरमध्ये आता नीरापासून गुळ उत्पादन लवंग, जि. सोलापूर : सध्या नीरा उत्पादनाचा हंगाम...
आरोग्य कर्मचाऱ्यासांठी सुरक्षेची पूर्ण...नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘कोरोना’...
अमरावती बाजार समितीची ३२ अडत्यांवर...अमरावती ः किरकोळ भाजी विक्री न करण्याचे आदेश...
‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा...मुंबई : ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा,...
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे...सोलापूर : कोरोना विषाणु संसर्गाच्या...
इस्लामपूरकरांना भाजीपाल्यासह साखरवाटप नवेखेड, जि. सांगली : बोरगाव (ता. वाळवा)...
राज्यातील अतिरिक्त १० लाख लिटर दूध...संगमनेर, जि.नगर : कोरोना विषाणूचा...