Agriculture news in Marathi Damage to 33,000 hectares of crops in Sangli | Page 3 ||| Agrowon

सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसान

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 जुलै 2021

जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २०२ गावांतील ३५ हजार २१७ हून अधिक शेतकऱ्यांच्या ३३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

सांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २०२ गावांतील ३५ हजार २१७ हून अधिक शेतकऱ्यांच्या ३३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सध्या महापुराच्या पाण्यात ऊस उभारलेला आहे. तर अन्य पिके बुडाली आहेत. कृषी विभागाच्या नजर अंदाजानुसार हे क्षेत्र २३ हजार ५३९ हेक्टर आहे. त्यात सर्वाधिक ऊस १३ हजार ७२२ हेक्टर, भुईमूग ५ हजार ३१६, फळपिके पावणेतीन हजार हेक्टरचा समावेश आहे. २०१९ मध्ये ५३ हजार हेक्टरचे नुकसान झाले होते.

पुराने सर्वाधिक उसाचे १३ हजार ७२२ हेक्टरवरील नुकसान झाले आहे. त्यानंतर भुईमूग ५ हजार ३१६ हेक्टर, विविध फळपिके २ हजार ७१७ हेक्टर, सोयाबीन ५५८ हेक्टर, इतर ५८२ हेक्टर, द्राक्ष ७० हेक्टर, ज्वारी- २८ हेक्टर, भाजीपाला ३१० हेक्टर, कडधान्य ६० हेक्टर, फूल पिकांच्या ५० हेक्टरचा समावेश आहे.

जिल्ह्यात २०१९ मध्ये आलेल्या महापुरापेक्षा यंदा शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात भाजीपाला पाण्याने कुजला. त्यामुळे दररोज येणारा पैसा थांबला. परिणामी आर्थिक फटका बसला आहे. आता प्रतीक्षा आहे ती नुकसान भरपाईची. वास्तविक पाहता २०१९ ला शेतीचे पंचनामे झाले. भरपाई देखील मिळाली. मात्र, अनेक शेतकरी गतवर्षीच्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे यंदाच्या पुराने नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे होतील. पण नुकसान भरपाई तातडीने मिळावी. पूर बाधित शेतकऱ्यांना गतवर्षी प्रमाणे प्रतीक्षा करावी लागणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे 

विमाधारक शेतकऱ्यांनी माहिती द्यावी
जिल्ह्यात ‘रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत पीकविमा काढलेला असल्यास नुकसानभरपाईसाठी ७२ तासांत विमा कंपनीस माहिती देणे बंधनकारक आहे. त्यासाठी क्रॉप इंशुरन्स ॲप, टोल फ्री क्रमांक - १८००१०२४०८८ यावर संपर्क साधावा.


इतर बातम्या
नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्त...नांदेड : जिल्ह्यात जुले, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये...
जळगावातील धरणांत ८० टक्के उपयुक्त...जळगाव ः जिल्ह्यात पावसाने आतापर्यंत लावलेल्या...
ऊसबिलाचे तुकडे पाडू  दिले जाणार नाहीत...सातारा : ऊसबिलाचे तुकडे पाडू दिले जाणार नाहीत,...
'लासलगाव'च्या कांद्याला टपाल पाकिटावर...नाशिक : कांदा पिकासाठी लासलगाव परिसराची राष्ट्रीय...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
‘येलदरी’च्या १०, ‘सिद्धेश्‍वर’च्या १२...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२...
‘मांजरा’ ४२ वर्षांत पंधरा वेळा भरलेलातूर ः लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या...
परभणी : ‘ई-पीक पाहणी’वर ७७ हजार...परभणी ः ‘‘ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे यंदाच्या...
पुण्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात...
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
साताऱ्यात ई-पीक पाहणीस अल्प प्रतिसाद सातारा : सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस...
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...
‘पीएम किसान’, ‘ई-पीक’चा तिढा सुटलापुणे ः महसूल व कृषी खात्यात तयार झालेल्या...
बुलडाण्यात ७४ टक्के शेतकऱ्यांना मिळाले...बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित...
नांदेड : पीकविमा कंपनीच्या विरोधात धरणे...नांदेड : मुखेड तालुक्यात इफ्को टोकियो पीकविमा...
जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार...
अकोला : पावसामुळे सोयाबीन, कापूस...अकोला : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर या भागात...