रत्नागिरीत सप्टेंबरमध्ये ३४ हेक्टर शेतीचे नुकसान

रत्नागिरीः मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात ३४.११ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले होते. त्यासंदर्भातील अहवाल जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे.
Damage to 34 hectares of farmland in Ratnagiri in September
Damage to 34 hectares of farmland in Ratnagiri in September

रत्नागिरी ः मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात ३४.११ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले होते. त्यासंदर्भातील अहवाल जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे.

त्या पाठोपाठ ऑक्टोबर महिन्यातही मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना भरपाई देण्यासंदर्भातील निर्णय या अखेरीस होईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

जून ते सप्टेंबर या कालावधीत मुसळधार पाऊस हे जिल्हावासीयांना नित्याचेच आहे. परंतु, भातशेती तयार झालेली असताना पाऊस पडला, तर ते शेतकऱ्यांच्या उलाढालीवर परिणामकारक ठरते. यंदा सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे राजापूर, संगमेश्‍वर, खेड, लांजा आणि रत्नागिरी तालुक्यातील नदीकाठावरील भातशेतीला फटका बसला. पुराचे पाणी किनाऱ्यावरील शेतात शिरले होते. 

नदीतील गाळ शेतात बसल्यामुळे भात रोपांचे नुकसान झाले होते. त्याचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश जिल्हा कृषी विभागाकडून दिले होते. त्यानुसार सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात ३४.११ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. सुमारे ३७१ शेतकऱ्यांना याचा फटका बसला. यामध्ये भाताचे ३२.८१ हेक्टर, तर उर्वरित अन्य पिकांचे क्षेत्र आहे. त्यात खेड २६.५९, संगमेश्‍वर ३.६५, लांजा ३.२४ तर राजापूरमधील ०.६३ हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

ओखी वादळावेळी झालेल्या नुकसानीपोटी हेक्टरी ६,८०० रुपये मदत शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात आली होती. जून २०२० मध्ये झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यासाठी शासनाकडून खास बाब म्हणून मदत जाहीर केली. त्याप्रमाणे जून ते ऑक्टोबर महिन्यात होणार्‍या नुकसान भरपाईबाबत शासन निर्णय काढला जातो. त्यावर सध्या झालेल्या नुकसानीपोटीची मदत अवलंबून असते. याला कृषी विभागाकडून दुजोरा मिळाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com