नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे नुकसान

नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१ गावांना फटका बसला. सहा तालुक्यातील ३८ हजार २४२ हेक्टरवरील खरिपासह बागायती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
 Damage to 38,000 hectares of crops in Nanded
Damage to 38,000 hectares of crops in Nanded

नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१ गावांना फटका बसला. सहा तालुक्यातील ३८ हजार २४२ हेक्टरवरील खरिपासह बागायती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

यासोबतच वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर नऊ लहान व ३१ मोठी अशी एकूण ४० जनावरे दगावली आहेत. तसेच ६२१ कच्च्या घरांची पडझड झाली, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षातून मिळाली.  

जिल्ह्यात मागील रविवारपासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे खरिपातील सोयाबीन, कपाशी, ज्वारी या पिकांना दिलासा मिळाला. परंतु, जिल्ह्यातील काही मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. त्यामुळे यात खरीप पिकांसह बागायती पिकांचा घास हिरावला. हा पाऊस नायगाव, उमरी, धर्माबाद, देगलूर, मुखेड व बिलोली या तालुक्यात अधिक होता. या तालुक्यातील काही मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली.

पिकांसह केळी, ऊस अशा बागायती पिकांचेही नुकसान झाले. या सोबतच निजपूर (ता. किनवट) सुर्यकांत सुदाम डोइफोडे (वय ३५) यांचा मंगळवारी (ता. १५) वीज पडून मृत्यू झाला. तर, नऊ लहान व ३१ मोठी अशी एकूण ४० जनावरे दगावली. तसेच ६२१ कच्च्या घरांची पडझड झाली.

बेन्नाळमधील पाझर तलाव फुटला

मागील काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे मुखेड तालुक्यातील बेन्नाळ येथील पाझर तलाव बुधवारी (ता.१६) मध्यरात्री फुटला. त्यामुळे शेती खरडून गेली. यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले तूर, सोयाबिन, ज्वारी, उडीद या पिकांचे नुकसान झाले. हा तलाव अनेक लहान-मोठ्या झाडा-झुडपांनी व्यापलेला होता. या झाडांच्या मुळा तलावाच्या खोलवर रुतल्यामुळे तलावाची तटभिंत कमकुवत झाली होती. त्यात दहा दिवसांपासून परिसरात सतत मुसळधार पाऊस होत असल्यामुळे हा तलाव पुर्णपणे भरला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com