Agriculture news in Marathi Damage to agricultural crops due to rain in Satara | Agrowon

सातारा जिल्ह्यात वादळी पावसाने शेतीपिकांचे नुकसान

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 एप्रिल 2020

कऱ्हाड, जि. सातारा ः दोन दिवसांपासून वाऱ्यासह सुरू असलेल्या वादळी पावसासह गारांमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके वाया गेल्याने सातारा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. एेन काढणीच्या हंगामातच पावसाने तडाखा दिल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. आस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडल्यासारखी स्थिती झाली आहे. 

कऱ्हाड, जि. सातारा ः दोन दिवसांपासून वाऱ्यासह सुरू असलेल्या वादळी पावसासह गारांमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके वाया गेल्याने सातारा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. एेन काढणीच्या हंगामातच पावसाने तडाखा दिल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. आस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडल्यासारखी स्थिती झाली आहे. 

‘कोरोना’मुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे शेतकरी त्यांच्या शेतात उपलब्ध असलेला शेतमाल बाजारपेठेत विक्रीसाठी आणण्यास धडपडत आहेत. मात्र, तरीही अनेक शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत आणता न आल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. या चक्रव्यूव्हात सध्या शेतकरी आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. त्यात वादळी वारा व गारांसह होत असलेल्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली आंबा, कलिंगड, फणस यासह दोडका, काकडी, टोमॅटो, कारले, पिके वाया गेल्याने जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या काढणीच्या हंगामातच पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. 

शेतकऱ्यांकडून भरपाईची मागणी 
लॉकडाऊनने शेती पिके धोक्यात आली आहेत. त्यातच वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तोडणीस आलेली भाजीपाल्याची व पालेभाज्यांची पिके वाया गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे आहे. त्यातून सावरण्यासाठी शासनाने अवकाळी पावसाने झालेल्या पिकांच्या, फळांच्या नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत 
आहे.

वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला. त्यामध्ये दोडका, कलिंगड, आंब्यासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मला मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यातून सावरण्यासाठी सरकाने आम्हाला भरपाई द्यावी. 
- धोंडीराम कोळेकर, शेतकरी, कळकेवाडी, सातारा
 


इतर ताज्या घडामोडी
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...
अकोटमध्ये अतिवृष्टीने कपाशी पाण्याखालीअकोला ः आजवर झालेल्या सततच्या पावसाने अकोट...
बुलडाण्यातील नुकसानीचे पंचनामे करून...बुलडाणा : पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे...
सातगाव पठारावर नुकसानग्रस्त बटाट्याचे...पुणे :‘‘लांबलेला मॉन्सून, सततचा कोसळणारा वादळी...
गाव पातळीवरील बैठका, सभा तात्पुरती...अकोला ः कोवीड १९ च्या वाढत्या प्रभावामुळे गाव...
नोकर भरतीची वयोमर्यादा वाढवाः...चंद्रपूर : कोरोना संकटामुळे या वर्षात नोकरीकरता...
लातूर, उस्मानाबादेत एक लाख ४१ हजार...उस्मानाबाद / लातूर : लातूर व उस्मानाबाद...
औरंगाबाद, जालन्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड...
मजुरांना कष्टाचे तरी पैसे मिळावेत नगर ः राज्यातील साखर कारखान्यांची तब्बल ८० हजार...
पोषक चाऱ्यासाठी ओट लागवडजनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी अधिक पोषणमूल्य...
राज्यात सोयाबीन २५०० ते ३९७४ रुपये नगरमध्ये ३००० ते ३७०० रुपये  नगर येथील...
कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पीक नियोजनकोरडवाहू  भागातील जमिनीतील ओलावा हा...
हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी फुले...महात्मा फुले कृषि विदयापिठाने कंबाईन हार्वेस्टरने...
मानवी आहारासाठी पोषणयुक्त जैवसंपृक्त वाणजैवसंपृक्त पिकांची लागवड केल्यास पौष्टिक व...
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...