Agriculture news in Marathi Damage to agriculture due to rupture of Megholi lake | Page 3 ||| Agrowon

मेघोली तलाव फुटून शेतीचे नुकसान

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021

मेघोली (ता. भुदरगड) येथील लघू तलाव फुटून एका महिलेचा मृत्यू झाला. ११ जनावरे वाहून गेली, तर परिसरातील ३०० हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. बुधवारी (ता. १) रात्री उशिरा ही घटना घडली.

कोल्हापूर ः मेघोली (ता. भुदरगड) येथील लघू तलाव फुटून एका महिलेचा मृत्यू झाला. ११ जनावरे वाहून गेली, तर परिसरातील ३०० हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. बुधवारी (ता. १) रात्री उशिरा ही घटना घडली.

तलावाच्या बांधातील माती, दगड, गोटे वाहून ओढ्याकाठच्या शेतीत पडल्याने शेकडो एकर शेतीसह पिके पूर्णतः उद्ध्वस्त झाली. मेघोली, तळकरवाडी, नवले, सोनुर्ली, वेंगळूर व ममदापूर ३०० हेक्‍टर जमीन वाहून केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून गुरुवारी (ता. २) तत्काळ पंचनामे पूर्ण करण्यात आले.

या दुर्घटनेत नवले गावातील जिजाबाई मोहिते (वय ५५) यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य थोडक्यात बचावले आहेत. शिवाय शेजारीच असलेल्या निवृत्ती मोहिते यांच्याही घरात पाणी शिरल्याने त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये त्यांची चार जनावरे गोठ्यातच मृत्युमुखी पडल्याचे समोर आले आहे. दरम्यान, ओढ्यालगत असणाऱ्या काहींच्या घराशेजारी लावलेल्या मोटारसायकलसुद्धा वाहून गेल्या असून, शेतीची मात्र मोठे नुकसान झाले आहे.

१९९६ मध्ये या तलावाच्या कामाला सुरुवात झाली. २००० मध्ये या तलावात प्रथम पाणीसाठा करण्यात आला. ९८ दलघफू पाणीसाठा केला जात होता. या तलावाच्या कामासाठी सुमारे ४ कोटी ७० लाख रुपये खर्च झाले. सुरुवातीपासूनच या तलावात गळती लागली होती. तलावाची गळती काढावी यासाठी या परिसरात शेतकऱ्यांनी वारंवार मागणी केली होती. तलाव फुटल्याने आता पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. तलावात गळती लागली होती. तलावाची गळती काढावी यासाठी या परिसरात शेतकऱ्यांनी वारंवार मागणी केली होती. परंतु याकडे दुर्लक्ष झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
अकोला, वाशीम जि.प.,पंचायत समिती...अकोला ः जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त...
आठवडी बाजार सुरू करा : मुनगंटीवारचंद्रपूर ः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव...
शिवसेनेचे शिष्टमंडळ लखीमपूरला जाणार;...नवी दिल्ली : लखीमपूर खेरी येथील हिंसा आणि...
सांगलीत १० ते १५ टक्क्यांनी सोयाबीनचे...सांगली ः जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी...लखनौ ः लखीमपूरमधील हिंसाचारानंतर राज्य...
लखीमपूर खेरीतील हिंसाचार...नवी दिल्ली ः शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या लखीमपूर...
पुणे जिल्ह्यातील पशुधन बाजार बंदपुणे ः केंद्र सरकारकडून वेळेत लसींचा पुरवठा न...
देशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...
मागणी वाढल्याने उन्हाळ  कांदा...नाशिक : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत...
आजच्या ग्रामसभांना ग्रामसेवकांचा विरोध नगर : राज्याच्या ग्रामविकास विभागाने आज (ता. २)...
राज्य सरकारने तातडीने भरपाईचा निर्णय...नागपूर : राज्यावर मोठी नैसर्गिक आपत्ती येते....
वीजदर सवलतीबाबत उपमुख्यमंत्री सकारात्मक कोल्हापूर : राज्यातील उच्च दाब आणि लघू दाब सहकारी...
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे...नाशिक : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
बँकांनी कर्ज प्रकरणे वेळेत मंजूर करावीत...वाशीम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांनी खरीप आणि...
शेतकरी आंदोलकांवर सर्वोच्च न्यायालय...नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमांवर ठाण...
‘माळेगाव कारखाना देणार  शेतकऱ्यांना ‘...माळेगाव, जि. पुणे : माळेगाव साखर कारखाना आगामी...
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...