बुलडाण्यातील नुकसानीचे पंचनामे करून अहवाल देणार

बुलडाणा : पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी शासनाकडे सकारात्मक अहवाल पाठविण्याचे आश्वासन जिल्हा प्रशासनाने दिले.
The damage in the bulldozer will be reported by panchnama
The damage in the bulldozer will be reported by panchnama

बुलडाणा : पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी शासनाकडे सकारात्मक अहवाल पाठविण्याचे आश्वासन जिल्हा प्रशासनाने दिले. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जमिनीत गाडून घेतलेले आंदोलन मागे घेतले. 

गत काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.  या नुकसानाचे पंचनामे करुन हेक्टरी २५ हजारांची मदत देण्याच्या मागणीसाठी टोकाचे पाऊल उचलत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह तीन कार्यकर्त्यांनी परडा येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतात स्वतःला गाडून घेतले होते. यामुळे प्रशासनाची एकच पळापळ झाली.

सायंकाळी प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत तातडीने पंचनामे करुन मदतीसाठी ‘पॉझिटीव्ह रिपोर्ट’ पाठविण्याची दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.

बुधवारी (ता. २३) रविकांत तुपकर त्यांच्या काही कार्यकर्त्यांसह नुकसानीची पाहणी करीत  परडा येथील मक्याचे नुकसान झालेल्या नारायण भिवटे यांच्या शेतात पोहोचले. तेथे शेतकऱ्यांचे अनावर झालेले अश्रू पाहून त्यांना दिलासा दिला. तातडीने टोकाचा निर्णय  घेत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतात गाडून घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांच्यासह शे.रफीक शे.करीम, सैय्यद वसीम व दत्ता पाटील यांनीही खड्डे करून गाढून घेतले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com