Agriculture news in marathi; Damage burden at headquarters, ginning factory | Page 2 ||| Agrowon

नुकसानीचा बोजा केंद्रप्रमुख, जिनिंग कारखान्यावर

चंद्रकांत जाधव
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस खरेदी केंद्रात अधिक आर्द्रतेचा (ओलावा) कापूस खरेदी करून सरकी, रुईचे नुकसान झाल्यास आपला केंद्रप्रमुख व संबंधित जिनिंग प्रेसिंग कारखान्याच्या संचालकास नुकसान भरपाई देण्यासंबंधी फतवा काढला आहे.

जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस खरेदी केंद्रात अधिक आर्द्रतेचा (ओलावा) कापूस खरेदी करून सरकी, रुईचे नुकसान झाल्यास आपला केंद्रप्रमुख व संबंधित जिनिंग प्रेसिंग कारखान्याच्या संचालकास नुकसान भरपाई देण्यासंबंधी फतवा काढला आहे.

अर्थातच सध्या अधिक आर्द्रतेचा कापूस येत असल्याने सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रांना विलंब झाला आहे. दुसरीकडे राज्यात कापसाला कुठेही हमीभाव मिळत नसल्याची स्थिती आहे. सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून तातडीने हस्तक्षेप करून कापूस खरेदी सर्वत्र सुरू करावी, आपले नियम, मापदंड काहीसे शिथिल करावेत, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. 

दिवाळीनंतर सीसीआयकडून राज्यभरात मागील हंगामात कापूस खरेदी सुरू झाली होती. यंदाही नोव्हेंबरच्या सुरुवातीला कापूस खरेदी सुरू होणे अपेक्षित होते. यंदा पाऊस लांबणीवर पडल्याने पूर्वहंगामी कापूस पिकात बोंडे ओली झाली. कापसाचा दर्जा घसरून नुकसान झाले आहे. या स्थितीत आपल्याला हव्या त्या दर्जाचा कापूस मिळत नसल्याने सीसीआयने कापूस खरेदी केंद्रांबाबत विलंब केल्याची माहिती आहे. 

शिरपूर (जि.धुळे) येथे सीसीआयने काही दिवसांपूर्वी कापूस खरेदी सुरू केली. सीसीआयला आठ टक्के आर्द्रतेचा कापूस खरेदी करायचा आहे. तसेच एक क्विंटल कापसात ६३ किलोपर्यंत सरकी मिळणे अपेक्षित आहे. शिरपूर येथील केंद्रात २५ टक्के आर्द्रतेचा कापूस येत होता. या कापसातून रुई व सरकी वेगळी केल्यानंतर सरकीची विक्री लागलीच होणे अपेक्षित आहे. परंतु सरकीमध्ये १२ टक्केच आर्द्रता सीसीआयला अपेक्षित आहे. परंतु सरकीमध्येदेखील ३० टक्के आर्द्रता दिसून येत आहे. अशा सरकीचे वजन घटून एका क्विंटलला फक्त ५० किलो सरकी मिळते. तर वातावरण ढगाळ, पावसाळी राहिले तर ३० टक्के आर्द्रतेच्या सरकीचे नुकसान होते. अशी सरकी लाल, काळी पडते. ती ऑइल मिलमालक खरेदी करीत नाहीत. मग या नुकसानीस संबंधित खरेदी केंद्रात नियुक्त केलेला सीसीआयचा केंद्रप्रमुख किंवा अधिकारी व संबंधित जिनिंग प्रेसिंग कारखानाचालक यांना जबाबदार धरले जात आहे.

नुकसान झाल्यास भरपाई द्यावी लागेल, या भीतीने शिरपूर येथील केंद्रातील कापूस खरेदी मागील आठवड्यात बंद करण्यात आली. जळगाव येथेही केंद्र सुरू करण्याच्या सूचना सीसीआयच्या वरिष्ठांनी केंद्रप्रमुख, जिनींग प्रेसिंग कारखानाचालक यांना दिल्या होत्या. सीसीआयच्या मापदंडानुसार कापसाचा दर्जा नसल्याने जळगावच्या केंद्रात कापूस खरेदी सुरू झालेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

सीसीआयला आपल्या मापदंडानुसार हवा असलेला कापूस डिसेंबरमध्ये मिळू शकेल. त्यासाठी निरभ्र, कोरड्या वातावरणाची गरज आहे. परंतु मध्येच ढगाळ वातावरण तयार होते. वातावरणात आर्द्रता अधिक वाढते. यामुळे सीसीआयची नियोजित सर्वच केंद्र कापूस खरेदीसाठी खानदेशात सुरू होणार नसल्याची माहिती आहे. 

बाजारातील दरांवर दबाव
सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली असती तर खासगी बाजारातील दरांवरील दबाव दूर झाला असता. परंतु सीसीआयची खरेदी कापसाच्या दर्जाच्या मुद्यामुळे लांबल्याने बाजारातील दरांवर काहीसा दबाव आहे. कापसाची खेडा खरेदी अजूनही हव्या त्या वेगात सुरू नसल्याचे बाजारातील विश्‍लेषक, व्यापारी सांगत आहेत. 

आम्हाला नुकसानीची भीती, शेतकऱ्यांचे हित पाहावे
आम्हाला जळगावचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याच्या सूचना काही दिवसांपूर्वी सीसीआयने दिल्या होत्या. परंतु सीसीआयला अगदी कोरडा (आठ टक्के आर्द्रता) कापूस हवा आहे. तसा कापूस माझ्या मते मार्चमध्ये मिळेल. कारण आपल्याकडे सध्या वातावरणात आर्द्रता, गारवा आहे. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे घरात साठविलेल्या कापसाचा दर्जाही हवा तसा नाही. सीसीआयच्या मापदंडानुसार कापसाची खरेदी केंद्रात झाली नाही व नुकसान झाले तर त्यास संबंधित केंद्रप्रमुख व जिनिंग प्रेसिंग कारखाना जबाबदार असेल, असा नियम सीसीआयने लागू केला आहे. यामुळे आम्ही आमच्या केंद्रात कापसाची खरेदी सुरू केलेली नाही. सध्या बाजारात कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. परंतु शेतकरी हित शासनाने लक्षात घेतले पाहिजे, असे सीसीआयचे खरेदी केंद्रधारक अविनाश भालेराव (जळगाव) यांनी ॲग्रोवनशी बोलताना सांगितले. 


इतर अॅग्रो विशेष
शेवंतीचे तीन वाण लवकरच पुणेः शेतकऱ्यांना शेवंतीच्या पांरपरिक वाणांना...
उत्तर प्रदेशात ‘एसएपी’त बदल नाहीनवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने सलग दुसऱ्या...
उसाचे ३८ गुंठ्यांत तब्बल १४७ टन उत्पादनकोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील...
कमी कालावधीचा दोडका देतोय चांगला नफागेल्या दोन, तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पुणे...
तापमानात चढ-उतारपुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी...
जीवघेणा बाजारदेशात बोगस, भेसळयुक्त, अनधिकृत कीडनाशकांचा वापर...
मत्स्यदुष्काळ का जाहीर होत नाही?शासनाचे मत्स्यदुष्काळाबाबतचे धोरण अत्यंत चुकीचे...
धुळे ९.४ अंश; थंडीत हळूहळू वाढपुणे ः आकाश निरभ्र झाल्याने थंडीत हळूहळू वाढ होऊ...
साईप्रवरा शेतकरी कंपनीची उलाढाल पोचली...नगर जिल्ह्यातील चिंचोली (ता. राहुरी) परिसरातील...
उन्हाळी नाचणी लागवडीचा यशस्वी प्रयोगकोल्हापूर : राज्यात उन्हाळी नाचणीचे यशस्वी...
बाजारात रानमेवा खातोय भावअकोला ः गुलाबी थंडीची चाहूल लागताच बाजारात विविध...
बोगस कीडनाशकांची विक्री ४००० कोटींवर ! पुणे : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दीडपट...
शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी ‘...सोलापूर : ठाकरे सरकारकडून किचकट ऑनलाइन...
राज्यातील साखर उत्पादन घटणारपुणे: राज्यातील साखर उत्पादन आधीच्या अंदाजाच्या...
भविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त...परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी...मुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान...
बेदाणा दरात वाढीचे संकेतसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले...
पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावा...पुणे: कृषी विभागाच्या कामकाजाची माहिती...
द्राक्षाचे ४० वाण आयात करणार : डॉ. ए....पुणेः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या...
सुटीच्या दिवशीही बाजार समित्या सुरू ठेवापुणे: अवकाळी पावसाने लांबलेल्या शेतमालाच्या...