मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसान

जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी पावसाने मोताळा तालुक्यात अनेक गावात पिकांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यात रविवारी सायंकाळी मोताळा, बोराखेडी, टाकळी वाघजाळ व इतर शिवारातील पिकांचे अतोनात नुकसान केले. कपाशी, मका, ज्वारी, सोयाबीन ही पिके जमिनदोस्त झाली आहेत.
Damage caused by heavy rains in Motala taluka
Damage caused by heavy rains in Motala taluka

बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी पावसाने मोताळा तालुक्यात अनेक गावात पिकांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यात रविवारी सायंकाळी मोताळा, बोराखेडी, टाकळी वाघजाळ व इतर शिवारातील पिकांचे अतोनात नुकसान केले. कपाशी, मका, ज्वारी, सोयाबीन ही पिके जमिनदोस्त झाली आहेत.

टाकळी वाघजाळ, परडा, शिरवा, सहस्त्रमुळी, वारूळी, नेहरूनगर, मूर्ती, राजूर, अंत्री, बोराखेडी, पुनई, तरोडा यासह २५ ते ३० गावांत जोरदार नुकसान झाले. सध्या सोयाबीन पीक काढणीला आले आहे. तर मक्याचे पीक वाढलेले असून कणसे परिपक्व होत आहे. कपाशीच्या बोंड्या परिपक्व होत असतानाच काही शिवारात पीक जमिनीवर लोळल्याने यामुळे नुकसान होऊ शकते.

धामगावबढे मंडळात अधिक फटका प्रामुख्याने मोताळा व धामणगाव बढे मंडळांत या पावसाने नुकसान अधिक झाले आहे. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात २५७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.यामध्ये कापूस १९२९ हेक्टर, मका ५९२ हेक्टर, ज्वारी ४९ हेक्टर, केळीचे ३ हेक्टरवर नुकसान झाले आहे. तर ३४२९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी दिली. कृषी सहायक याबाबत माहिती गोळा करीत असल्याचे ते म्हणाले.

आमदारांनी केली पाहणी दरम्यान पीक नुकसानीची रविवारी आमदार संजय गायकवाड यांनीही पाहणी केली. याबाबत यंत्रणांनी तातडीने सर्वेक्षण करावे, अशी सूचना त्यांनी केली. कपाशी, मका, सोयाबीनचे झालेले नुकसान पाहता हे काम प्राधान्याने करण्याचे त्यांनी सांगितले.  

नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्या या नुकसानाचे तातडीने पंचनामे करीत शासनाने मदत द्यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे मोताळा तालुकाध्यक्ष अनिल खाकरे, जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल खाकरे यांनी तहसीलदारांमार्फत वरिष्ठांकडे केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com