नाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार हेक्टरवर नुकसान

नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाने जोर धरला. त्यामुळे काढणीस आलेल्या खरीप पिकांचे ३७ हजार ८३९ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
 Damage to crops on 37,000 hectares in Nashik district
Damage to crops on 37,000 hectares in Nashik district

नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाने जोर धरला. त्यामुळे काढणीस आलेल्या खरीप पिकांचे ३७ हजार ८३९ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

त्यामध्ये सर्वाधिक नुकसान हे चांदवड तालुक्यातील ११२ गावांमध्ये झाले आहे. ३६ हजार ५०९ शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका बसला आहे. जिरायतीमध्ये मका, तर भाजीपाला पिकांमध्ये कांदा नुकसान अधिक आहे.

मालेगाव, बागलाण, नांदगाव, कळवण, देवळा, दिंडोरी, निफाड, सिन्नर, येवला आणि चांदवड तालुक्यांतील २६३ गावांमध्ये अतिवृष्टीने ३७ हजार ८३९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. मका पिकाच्या १७ हजार ८१५ हेक्टर क्षेत्राला, तर सोयाबीनच्या ४ हजार ५१८ हेक्टर पिकाला दणका बसला आहे. बागायती क्षेत्रामध्ये कांद्याचे ९ हजार ९५९ हेक्टरवर नुकसान झाले. 

जिल्ह्यात अनेक भागात मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन ही पिके काढणीस आहेत. मात्र, ती वादळी पावसाने जमीनदोस्त झाली आहेत. शेतांमध्ये पाणी साचून असल्याने सोंगणी करता येत नाही. त्यामुळे अडचणी वाढणार असल्याचे चित्र आहे.

यासह बाजरी भुईमूग या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे. भात, कापूस, ज्वारीचे नुकसान कमी प्रमाणात आहे. सोयाबीन शेंगा सततच्या पावसामुळे काळवंडल्या आहेत. मक्याचे उभे पीक भुईसपाट झाले आहे. तर, बागायती क्षेत्रात कांद्यासह टोमॅटो, ऊस पिकलाही पावसाचा फटका बसला आहे. बहुवार्षिक फळपिकांमध्ये डाळिंबांचे २९८ हेक्टर क्षेत्रावर, तर द्राक्षाचे २३ हेक्टरवर नुकसान आहे. 

कांद्याचे पीक संकटात 

लेट खरीप कांद्यासाठी तयार केलेल्या १ हजार ३५७ हेक्टरवरील रोपवाटिका नुकसानीच्या तोंडी सापडल्या आहेत. त्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत. त्यातच अतिवृष्टीमुळे ९९५९ हेक्टरवरील कांद्याचे नुकसान झाले आहे. कांदा लागवडी व रोपांचे सर्वाधिक नुकसान चांदवड तालुक्यात आहे.

नुकसानीची स्थिती (हेक्टर)

जिरायती पिके २२५४१.९५
बागायती पिके ११९६२.०४
वार्षिक फळपिके ४.७०
बहुवार्षिक फळपिके ३२१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com