agriculture news in marathi Damage to crops on 63 thousand hectares in Nagar district | Agrowon

नगर जिल्ह्यात पिकांचे ६३ हजार हेक्टरवर नुकसान

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

नगरः सप्टेंबर महिन्यातील सलगच्या २० दिवसांच्या पावसाने जिल्ह्यात तब्बल ६३ हजार ८०७ हेक्टरवर नुकसान झाले आहे. तसा अंतिम अहवाल प्रशासनाने तयार केला आहे. १ लाख १६ हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. 

नगरः सप्टेंबर महिन्यातील सलगच्या २० दिवसांच्या पावसाने जिल्ह्यात तब्बल ६३ हजार ८०७ हेक्टरवर नुकसान झाले आहे. तसा अंतिम अहवाल प्रशासनाने तयार केला आहे. १ लाख १६ हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. 

सरकारी निकषानुसार या नुकसानीची भरपाई देण्यासाठी ५८ कोटी ९० लाख रुपये अपेक्षित असल्याचे अहवालात नमूद केले आहे. या महिन्यातही साधारण साठ हजार हेक्टरवर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कर्जत, जामखेड आणि अकोले तालुक्यात सप्टेंबर महिन्यात एकाही शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही, असे अहवालात स्पष्ट केले आहे. 

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात सतत वीस दिवस झालेल्या पावसामुळे खरिपातील सोयाबीन, बाजरी, मका, तूर, भुईमूग, कापसाचे मोठे नुकसान झाले. फळपीके व भाजीपाल्यालाही मोठा फटका बसला आहे. प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानंतर सप्टेंबरमधील अंतिम नुकसानीचा अहवाल तयार केला आहे. 

सरकारी नियमानुसार जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी ६ हजार ८००, बागायती क्षेत्रासाठी १३ हजार ५०० व फळबागांसाठी १८ हजार रुपये हेक्टरी मदत देण्यासाठी ५८ कोटी ९० लाखाची गरज आहे, असे अहवालात नमूद केले आहे. 

सप्टेंबरमध्ये सर्वाधिक फटका राहुरी, शेवगाव तालुक्याला बसला. येथे १६ हजार ९४१, तर राहुरी तालुक्यात १९ हजार ८५३ हेक्टर क्षेत्र बाधित आहे. कर्जत, जामखेड आणि अकोले तालुक्यात सप्टेंबरमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही, असे अहवालात स्पष्ट केले आहे. या महिन्यातही शेवगाव, पाथर्डीलाच अधिक फटका आहे. श्रीगोंदा, नगरला नुकसान अल्प आहे. 

अनेक ठिकाणी नाहीत पंचनामे  

अतिवृष्टीची (२४ तासात ६५ मिलिमीटर पाऊस) नोंद झालेल्या महसूल मंडळांतच पंचनामे केले जात आहेत. शब्दाचा खेळ करत अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पंचनामे केले जात असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, अनेक भागात पावसाने नुकसान होऊनही केवळ अतिवृष्टीची नोंद नसल्याच्या कारणाने अनेक ठिकाणी पंचनामे झालेच नाहीत.

शिवाय ३३ टक्क्‍यापेक्षा कमी नुकसान ग्रहित धरले गेले नाही. त्यामुळे नुकसानीचे क्षेत्र ८० हजार हेक्टरच्या जवळपास असल्याचे शेतकरी सांगत आहेत. विशेष म्हणजे या मुद्यावर शेतकरी नेते, पदाधिकारी गप्प आहेत. 

असे आहे नुकसान

एकूण नुकसान ६३ हजार ८०७ हेक्टर
बाधित गावे ३८७ 
नुकसानग्रस्त शेतकरी १ लाख १६ हजार ६३८
जिरायती क्षेत्र ४० हजार ८२३ हेक्टर
बागायत क्षेत्र २२ हजार ८५५ हेक्टर
फळपिकांचे क्षेत्र १२८  ः हेक्टर


इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये ‘स्वाभिमानी’चा रात्रभर...नाशिक  : दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यातील ६५८...सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८...
कसमादेत बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देवळा, जि. नाशिक : मृत कोंबडी पक्षांची...
नांदेडमध्ये ‘पणन’कडून कापसाची २६ हजार...नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
कृषी कायद्यांविरोधात जागरण आंदोलनपुणे ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन...
परभणीत केंद्र सरकारविरुद्ध निदर्शनेपरभणी : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या...
निम्न दुधनाच्या दोन्ही कालव्यात पाणीपरतूर, जि. जालना ः ‘‘रब्बी हंगामातील...
औरंगाबादमध्ये `स्वाभिमानी’चे...औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’चा जागर सोलापूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी...
धुळे- नंदुरबार मतदारसंघात पटेलांपुढे...धुळे ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार...
आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन...पुणे ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
साताऱ्यात स्वाभिमानी संघटनेचे रात्रभर...सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना...
सिंचनासाठी ‘वान’वरून जलवाहिनी उभारावीतेल्हारा, जि. अकोला ः शासनाने अगोदर सिंचनासाठी...
वहितीदारांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी...नांदेड : ‘‘शेती करताना विविध कारणांनी शेतकऱ्यांचा...
बीड जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी...बीड ः महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी...
काँग्रेसने ५८ वर्षांनी भेदला भाजपचा गडनागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी...
लाडांच्या घरात ५८ वर्षांनंतर आमदारकीसांगली : तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या...
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जैवविविधतेचे...परभणी ः मातीची पर्यायाने शेत जमिनीची सजीवता,...
आघाडीने चारली भाजपला धूळपुणे ः महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलेल्या...
रत्नागिरीत जमिनीमध्ये नत्र, स्फुरदचे...रत्नागिरी ः जिल्ह्यातील जांभ्या जमिनीत नत्रासह...