Agriculture news in Marathi Damage to crops on 66,000 hectares in Vidarbha | Page 3 ||| Agrowon

विदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान

टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 जुलै 2021

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात शनिवारी (ता. २४) पावसाने उघडीप दिली असली तरी गोंदिया जिल्ह्यात मात्र आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

नागपूर : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात शनिवारी (ता. २४) पावसाने उघडीप दिली असली तरी गोंदिया जिल्ह्यात मात्र आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान विदर्भात गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत सर्वाधिक ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

गेल्या तीन दिवसांत पावसाने जोरदार फटकेबाजी केली. अकोला जिल्ह्यात सर्वाधिक २०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यवतमाळ जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. अमरावती जिल्हादेखील याला अपवाद नव्हता. आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत अकोला जिल्ह्यात ३२.६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. अमरावती जिल्ह्यात १.४, बुलडाणा निरंक, चंद्रपूर ६.४, गडचिरोली निरंक, गोंदिया १२०.२, नागपूर १ मिलिमीटर पावसाची नोंद झाली वर्धा, वाशीम, यवतमाळ या तीनही जिल्ह्यात पाऊस नव्हता. शनिवारी विदर्भात सर्वदूर पावसाने उघडीप दिल्याची माहिती हवामान खात्यातील सूत्रांनी दिली.

नागपूर विभागातील वर्धा जिल्हा वगळता उर्वरित पाच जिल्ह्यांमध्ये नुकसान नसल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात केवळ ४१८ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी या संदर्भाने दुजोरा दिला.

कृषी विभागाने पीक नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार केला आहे. कृषी आयुक्तालयाला हा अहवाल पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. अमरावती जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये २९५ गावांत २२ हजार २३९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, तर ३० हेक्‍टर क्षेत्र खरडून गेले आहे. अकोला जिल्ह्यात ३२५ गावांमध्ये ३३ हजार ७९८ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. यवतमाळ जिल्ह्यात १६ तालुक्यांत १३४ गावांमध्ये नुकसान झाले असून, ६९६९.५० हेक्टर क्षेत्र आहे. या जिल्ह्यात ३४२ हेक्टर क्षेत्र खरडून गेले. बुलडाणा जिल्ह्यात तालुक्यात नुकसान झाले आहे. बाधित गावांची संख्या अकरा असून, ५९४ क्षेत्रावरील पीक नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

वाशीममध्ये अडीच हजार हेक्टरला फटका
वाशीम जिल्ह्यात सहा तालुक्यांतील ४६ गावांमध्ये २ हजार ६७१ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, पंधरा हेक्टरवरील पिके खरडून गेली आहेत. पश्‍चिम विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.


इतर बातम्या
चांगल्या पावसामुळे ‘मनरेगा’ला प्रतिसादजळगाव : कोरोनाकाळात ग्रामीण भागातील नागरिकांना...
आंबेगाव तालुक्यात  बटाटा लागवड सुरू महाळुंगे पडवळ, जि. पुणे : बटाटा उत्पादनाचे आगार...
‘गिरणा’ पात्रात ‘प्रहार’चे जलसमाधी...नाशिक : गिरणा धरणामध्ये मासेमारीचा ठेका...
खानदेशात पावसाचा धुमाकूळजळगाव ः खानदेशात ऑगस्ट, सप्टेंबरच्या पहिल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारापुणे : पोषक हवामानामुळे राज्यात सर्वदूर पावसाचा...
‘महाडीबीटी’ भक्कम; माघार नाहीपुणे ः कृषी विभागाच्या योजना ‘ऑनलाइन’ तंत्रज्ञान...
नांदेड : हळदीचे कंद जमिनीत सडलेनांदेड : गोदावरी नदीच्या पुरामुळे बागायती पिकांना...
हळद निर्यात ऑगस्टमध्ये ११ टक्क्यांनी...पुणे : देशात निर्यातयोग्य हळदीचा साठा उपलब्ध आहे...
‘पंतप्रधान शेतकरी सन्मान’ची जबाबदारी...न्यायडोंगरी, ता. नांदगाव : पंतप्रधान शेतकरी...
सर्व कामे करता येतील असे एकच यंत्र...नगर ः शेतातील सर्व प्रकारची कामे एकाच यंत्राने...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र...
ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासूनमुंबई : राज्यात २०२१-२२ साठी उसाचा गाळप हंगाम १५...
पुणे जिल्ह्यातील अकरा धरणे भरलीपुणे : सप्टेंबरमध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रात...
नांदुरा तालुक्यात कपाशी पीक करपू लागलेनांदुरा, जि. बुलडाणा : गेल्या आठवड्यात सतत पाऊस...
सांगली जिल्हा बॅंकेच्या चौकशीचे आदेशसांगली ः सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात...
धरणे अद्याप तहानलेलीचपुणे : जून, जुलै महिन्यात पावसाने धुमाकूळ...
परभणी जिल्ह्यात एक लाख हेक्टरवरील...परभणी : जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते बुधवार (ता. ७...
`‘रोहयो’साठी जलसंधारण, कृषी विभागाने...सोलापूर ः ‘‘जिथे पाऊस पडतो, तिथले पाणी...
एफआरपीच्या तुकड्याविरुध्द 'स्वाभिमानी'...वणी, ता. दिंडोरी ः‘‘'एफआरपी'चे तीन तुकडे करण्याचा...
शिराळा तालुक्यातील तलावांचे मोठे नुकसानशिराळा, जि. सांगली  ः तालुक्यात या अनेक...