Agriculture news in Marathi Damage to crops on 66,000 hectares in Vidarbha | Page 3 ||| Agrowon

विदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान

टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 जुलै 2021

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात शनिवारी (ता. २४) पावसाने उघडीप दिली असली तरी गोंदिया जिल्ह्यात मात्र आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

नागपूर : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात शनिवारी (ता. २४) पावसाने उघडीप दिली असली तरी गोंदिया जिल्ह्यात मात्र आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान विदर्भात गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत सर्वाधिक ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

गेल्या तीन दिवसांत पावसाने जोरदार फटकेबाजी केली. अकोला जिल्ह्यात सर्वाधिक २०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यवतमाळ जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. अमरावती जिल्हादेखील याला अपवाद नव्हता. आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत अकोला जिल्ह्यात ३२.६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. अमरावती जिल्ह्यात १.४, बुलडाणा निरंक, चंद्रपूर ६.४, गडचिरोली निरंक, गोंदिया १२०.२, नागपूर १ मिलिमीटर पावसाची नोंद झाली वर्धा, वाशीम, यवतमाळ या तीनही जिल्ह्यात पाऊस नव्हता. शनिवारी विदर्भात सर्वदूर पावसाने उघडीप दिल्याची माहिती हवामान खात्यातील सूत्रांनी दिली.

नागपूर विभागातील वर्धा जिल्हा वगळता उर्वरित पाच जिल्ह्यांमध्ये नुकसान नसल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात केवळ ४१८ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी या संदर्भाने दुजोरा दिला.

कृषी विभागाने पीक नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार केला आहे. कृषी आयुक्तालयाला हा अहवाल पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. अमरावती जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये २९५ गावांत २२ हजार २३९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, तर ३० हेक्‍टर क्षेत्र खरडून गेले आहे. अकोला जिल्ह्यात ३२५ गावांमध्ये ३३ हजार ७९८ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. यवतमाळ जिल्ह्यात १६ तालुक्यांत १३४ गावांमध्ये नुकसान झाले असून, ६९६९.५० हेक्टर क्षेत्र आहे. या जिल्ह्यात ३४२ हेक्टर क्षेत्र खरडून गेले. बुलडाणा जिल्ह्यात तालुक्यात नुकसान झाले आहे. बाधित गावांची संख्या अकरा असून, ५९४ क्षेत्रावरील पीक नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

वाशीममध्ये अडीच हजार हेक्टरला फटका
वाशीम जिल्ह्यात सहा तालुक्यांतील ४६ गावांमध्ये २ हजार ६७१ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, पंधरा हेक्टरवरील पिके खरडून गेली आहेत. पश्‍चिम विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.


इतर ताज्या घडामोडी
वसुंधरेला धनधान्याने समृद्ध करा ः...दापोली, जि. रत्नागिरी ः शेती करणे हे जगातील...
पीकविमाप्रश्‍नी चूल बंद आंदोलनाला...निफाड, जि. नाशिक : तालुक्याच्या पूर्व भागात दोन...
‘कादवा’ करणार सीएनजी निर्मिती ः अध्यक्ष...नाशिक : साखर उद्योग मोठ्या अडचणीतून मार्गक्रमण...
मेघोली तलाव फुटून शेतीचे नुकसानकोल्हापूर ः मेघोली (ता. भुदरगड) येथील लघू तलाव...
नगर, शेवगाव, पाथर्डीत पावसाने नुकसाननगर ः शेवगाव, पाथर्डी, नगर तालुक्यांत दोन...
खडकपूर्णा प्रकल्पाचे तीन गेट उघडले बुलडाणा ः मराठवाड्यात होत असलेल्या पावसाचा फायदा...
पीकविमा न देणाऱ्या ११ बँकांवर कारवाईजळगाव ः जिल्ह्यात सुमारे दहा हजार शेतकऱ्यांनी...
डॉ. आढाव, रावल यांना आबासाहेब वीर...सातारा : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी किसन महादेव...
मराठवाड्यात ६७ मंडळांत अतिवृष्टीऔरंगाबाद : कायम लहरीपणाचा परिचय देणारा पाऊस...
कपाशी, मिरची पिकांत वाढली ‘मर’औरंगाबाद : पावसाची उघडीप मिळाली असताना आता...
सरकारकडून तिसऱ्या लाटेचा बाऊ ः...नागपूर : राज्य सरकार स्वतःचे अपयश लपविण्यासाठी...
यंदाही बैलपोळा सण साजरा होणार की नाही?अकोला ः गेल्यावर्षात कोरोना निर्बंधामुळे पोळा...
चालते-बोलते विद्यापीठ काळाच्या पडद्याआडपुणे : डॉ. ज्ञानदेव हापसे हे ऊस विज्ञानाचे चालते-...
रब्बी पीक प्रात्यक्षिक अर्जाला आजपासून...हिंगोली : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (अन्नधान्य...
निकृष्ट साहित्य मारले शेतकऱ्यांच्या माथीनागपूर ः गैरप्रकारांना चाप बसावा याकरिता थेट...
सोलापूर : भाजीपाल्यांचे दर दबावाखालीसोलापूर : आधीच पावसाने प्रदीर्घ विश्रांती...
कोल्हापुरात भाज्यांचे दर आठवड्यात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत गेल्या सप्तहापासून...
सिमला मिरची पाच, टोमॅटो चार रुपये किलोनगर : नगरसह जिल्हाभरातील बाजार समित्यांत टोमॅटोला...
सांगली : उत्पादन खर्च वाढला,...सांगली : आठवडा बाजार सुरू झाले आहेत, पण व्यवहार...
सातारा : टोमॅटो, ढोबळी, घेवड्याच्या...सातारा : जुलै महिन्यात झालेली अतिवृष्टी, सध्या...