Agriculture news in marathi Damage to crops due to heavy rain in Nilanga taluka | Agrowon

निलंगा तालुक्यात पूर्वमोसमी पावसाचा फटका 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 एप्रिल 2020

लातूर ः ‘कोरोना’मुळे सुरू असलेल्या लाॅकडाऊनमुळे घरात असलेला शेतमाल बाजारात नेता येईना, शेतात असलेले पीक काढता येईना, अशा कोंडीत शेतकरी सापडला आहे. अशातच पूर्वमोसमी पावसाने या शेतकऱ्यांना फटका बसला आहे. शनिवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे औराद शहाजनी (ता. निलंगा) परिसरात शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसाचा रेणापूर तालुक्यातील यशवंतवाडी येथेही फटका बसला आहे. गारा, वादळी वारे व त्यात पाऊस यामुळे फळपिके, भाजीपाला तसेच रब्बी ज्वारीचे लाखोंचे नुकसान झाले आहे. दरम्यान या नुकसानीचे पंचनामे करावेत, असे आदेश पालकमंत्री अमित देशमुख यांनी प्रशासनाला दिले आहेत. रविवारी (ता. १९) प्रशासनाच्या वतीने नुकसानीची पाहणी सुरू करण्यात आली आहे. 

या पावसामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेली गहू, ज्वारी, हरभरा या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच फळबागा आणि भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून नेल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. अगोदरच ‘कोरोना’मुळे शेतकरी त्रस्त आहे. शेतातील पिके काढण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. औराद शहाजनी परिसरात सुमारे दोनशे एकरवरचे नुकसान झाल्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत. या पावसाचा फटका किल्लारी (ता. औसा) परिसरालाही बसला आहे. 

दरम्यान जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी, असे आदेश पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. औराद शहाजनी परिसरात शनिवारी ५२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. रविवारी प्रशासनाच्या वतीने औराद शहाजनीसह ज्या-ज्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे, त्याची पाहणी करण्यात येत आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी दिली. 

इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...