Agriculture news in marathi; Damage to crops due to leakage in Punegaon canal | Agrowon

पुणेगाव कालव्याला गळतीमुळे पिकांचे नुकसान

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

नाशिक  : चालू वर्षी पाऊस अधिक झाल्याने पुणेगाव कालव्यातून पूरपाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याचा कालव्यातून विसर्ग होत असताना मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याने कालव्याच्या बाजूला असणाऱ्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या निकृष्ट कामामुळे आमचे नुकसान होत असल्याचा आरोप येथील असलेल्या शेतकऱ्यांनी केला. त्याचा पिंपळणारे व परिसरातील शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

नाशिक  : चालू वर्षी पाऊस अधिक झाल्याने पुणेगाव कालव्यातून पूरपाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याचा कालव्यातून विसर्ग होत असताना मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याने कालव्याच्या बाजूला असणाऱ्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या निकृष्ट कामामुळे आमचे नुकसान होत असल्याचा आरोप येथील असलेल्या शेतकऱ्यांनी केला. त्याचा पिंपळणारे व परिसरातील शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

अनेक शेतकऱ्यांनी या पाणीगळतीला कंटाळून यापूर्वी द्राक्षबाग तोडल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पीकपद्धतीमध्ये बदल करून टोमॅटो, मका यांसारखी पिके घ्यायला सुरवात केली आहे. मात्र, या पिकांमध्ये गळती होणारे पाणी जात असल्याने अडचणी कायम आहेत. त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. 

या कालव्याला काही ठिकाणी अस्तरीकरण बाकी आहे. त्यात लोकप्रतिनिधी हे पाणी पुढे पाठवण्यासाठी काम करत आहेत; परंतु मागील भागात काय परिस्थिती आहे. याकडे कोणीच लक्ष देत नाहीत, असा आरोप शेतकरी करत आहेत. त्यामुळे कामे पूर्ण करत कालव्याची स्थिती सुधारावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 
 

आलेल्या प्रमुख अडचणी :

  •    शेतात पाणी साचल्याने द्राक्षछाटण्या लांबणीवर
  •    ज्या द्राक्षबागांच्या छाटण्या पूर्ण, त्या ठिकाणी घड जिरण्याची भीती
  •    मका पिकात पाणी साचून राहिल्याने पिके सडण्याची भीती
  •    पाणी साचून राहिल्याने टोमॅटो तोडणीला व्यत्यय 
टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
पुणे विभागात गव्हाचा १ लाख ६८ हजार...पुणे  ः पुणे विभागात गव्हाच्या पेरण्या...
खासदार औद्योगिक महोत्सवाच्या माध्यमातून...नागपूर  ः खासदार औद्योगिक महोत्सवाच्या...
अकोला कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे...अकोला  : ‘कृषी’चे पदव्युत्तर शिक्षण हे...
तीन जिल्ह्यांत तूर विक्रीसाठी २९...नांदेड  ः मराठवाड्यातील नांदेड, परभणी,...
आळसंद येथील पशुवैद्यकीय दवाखाना उद्‌...आळसंद, जि. सांगली : आळसंद (ता. खानापूर) येथे...
तीन जिल्ह्यांत सतरा लाख ४१ हजार क्विंटल...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
जावळी तालुक्यात वन्यप्राण्यांकडून... मेढा, जि. सातारा : जावळी तालुक्‍यात...
कातळावरील गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीचा...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कांदळगाव (ता. मालवण)...
सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांना सुविधा...नाशिक : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देऊन त्यांचा...
महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात रताळी,...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
बदलत्या हवामानात कृषी जैवविविधतेचे...संयुक्त राष्ट्रसंघाच्या कृषी जैवविविधता आणि अन्न...
हरितगृह वायू कोणते?मागील लेखामध्ये हरितगृह परिणाम म्हणजे काय, ते आपण...
जागतिक तापमानवाढीवर हरितगृह वायूंचा...सध्या सर्वत्र तापमानवाढीची चर्चा असली, तरी...
गिरणा परिसरात कांदा लागवडीकडे कलमेहुणबारे, जि. जळगाव  ः चाळीसगाव तालुक्‍यात...
घराघरांत पोचणार नळ कनेक्‍शन, बसणार मीटर...जळगाव  : जिल्ह्यात ग्रामीण भागातील जनतेला...
जळगाव जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेतून...जळगाव : राज्यातील महाविकास आघाडी शासनाने महात्मा...
शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक कर्जमुक्तीचा...अकोला ः शेतकरी कर्जदार नसून तो भूमीचा राजा आहे....
केंद्राच्या पथकाकडून लासलगावला कांदा...नाशिक  : कांद्याचे घसरते बाजार भाव पाहता...
`रेशीम प्रकल्पाच्या मंजुरीसाठी...औरंगाबाद : राज्यातील रेशीम उद्योगाच्या एकूणच...
अमरावती येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना...अमरावती ः जिल्हा परिषदेत आठवड्यातील दोन दिवस...