Agriculture news in marathi Damage to crops due to rain with hail in Dawarwadi area | Agrowon

दावरवाडी परिसरात गारपिटीने फळबागांचे नुकसान

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 मार्च 2020

दावरवाडी, जि. औरंगाबाद : नांदर (ता. पैठण) परिसरात बुधवारी (ता. २५) पुन्हा सायंकाळी साडे सहा ते रात्रीच्या दहापर्यंत झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसाने फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. तर इतर पिके पूर्णपणे वाया गेल्याने शेतकरी हवालदिन झाले आहेत.

दावरवाडी, जि. औरंगाबाद : नांदर (ता. पैठण) परिसरात बुधवारी (ता. २५) पुन्हा सायंकाळी साडे सहा ते रात्रीच्या दहापर्यंत झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसाने फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. तर इतर पिके पूर्णपणे वाया गेल्याने शेतकरी हवालदिन झाले आहेत.

बुधवारी (ता. २५) रात्री आलेल्या गारपिटीने परिसरातील मोसंबी, संत्रा, डाळिंब या फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. तसेच ज्वारी, उन्हाळी बाजरी, गहू, हरभरा आदी पिके भिजून आडवी झाली आहेत. शेतकरी दिनकर सुखदेव सोनवणे यांची नांदर शिवारात गट नं (८६) मधील संत्र्याची दोनशे झाडांची फळबाग आहे. दोन चार दिवसांत ते संत्रे तोडूण विक्रीला घेऊन जाणार होते. परंतु गारपिटीसह वादळी पावसामुळे झाडावरील संत्र्याच्या फळांची गळती होऊन, झाडे देखील मोडली. यामुळे या शेतकऱ्याचे जवळपास पाच लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. 

दुसरे शेतकरी अण्णासाहेब गवारे यांचा गट नं.(२१०) मध्ये दोन एकरांत शेवग्याच्या २००० झाडांची लागवड केलेली आहे. त्या झाडांचे ही या वादळी वाऱ्यात नुकसान झाले. यामध्ये सुमारे साठ टक्के शेंगांनी लगडलेली झाडे मोडून जमिनदोस्त झाली आहेत. सध्या शेवग्याच्या शेंगांना बाजारात ४० ते ५० रूपये किलोचा भाव असल्याने हातात आलेले लाखो रुपयांचे पीक वाया गेल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.

वादळी वाऱ्यासह गारपिटीने नुकसान झालेल्या फळपिकांचे व रब्बीच्या नुकसानग्रस्त पिकाची पाहणी तलाठी आर. पी. सोनवणे यांनी थेट शेतावर जाऊन केली. पिकांचे महसूल प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी अर्जून काळे, राजेंद्र गवारे, यशवंत राऊत, दीपक काळे, बाळासाहेब खुळे आदींनी केली आहे.


इतर बातम्या
पुण्यात पोलिस बंदोबस्तात बाजार समिती...पुणे : कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन असतानाही...
पुणे बाजार समिती आजपासून सुरु; मात्र...पुणे : कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या...
देशातील रुग्णसंख्या ९०० च्या घरातनवी दिल्ली : महासत्ता अमेरिकेसह संपूर्ण जगात...
देशातील वस्त्रोद्योगाला दोन लाख कोटींचा...जळगाव ः देशात शेतीनंतर रोजगाराचा व आर्थिक...
राज्यातील कोरोना रुग्णाची संख्या १८१;...मुंबई : राज्यात शनिवारी (ता.२९) आणखी २८ कोरोना...
मुंबई बाजार समितीत आज व्यापाऱ्यांचा...मुंबई : राज्य शासनाच्या आदेशामुळे सुरू...
फळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी राज्यभर...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना फळे व...
‘कोरोना’चा सामना करण्यासाठी ११ हजार...अकोला  ः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
नगर जिल्हा बॅंकेने दिले कर्जवसुलीचे...नगर ः कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी करण्यासाठी...
वाशीममधील कृषी निविष्ठा केंद्रे सुरू...वाशीम : ‘कोरोना’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर...
नगर, पुणे, सोलापूरात हजारवर वाहतूक...पुणे ः शहरांमध्ये भाजीपाला, फळे, दुध अशा...
वऱ्हाडातील ६५ हजारांवर नागरिक गावी परतलेअकोला ः रोजगार, नोकरीच्या निमित्ताने शहरांमध्ये...
अकोल्यातील दिड हजारांवर शेतकऱ्यांची...अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
जिल्हा परिषदेचे दीड लाख कर्मचारी देणार...नगर ः कोरोना संसर्गाबाबत उपाययोजना करण्यासाठी...
राज्यात पुर्वमोसमी पावसाचा आजही अंदाज पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुर्वमोसमी...
नगर जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी पावसाचा...नगर  ः नगर जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी...
शेतमाल निर्यातीसाठी वाणिज्य मंत्रालयाने...नागपूर  ः राज्यात जारी करण्यात आलेल्या...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात पाऊस औरंगाबाद/जालना: दोन्ही जिल्ह्यातील जवळपास ६७...
कलिंगड, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना फटकासोलापूर ः खास उन्हाळी हंगाम डोळ्यासमोर ठेवून...
राज्य तलाठी संघांकडून एक दिवसाचे वेतन...परभणी ः कोरोना बाधितांच्या मदतीसाठी तलाठी, मंडल...