जळगाव जिल्ह्यात पावसामुळे पिकांचे नुकसान

जळगाव जिल्ह्यात पावसामुळे पिकांचे नुकसान
जळगाव जिल्ह्यात पावसामुळे पिकांचे नुकसान

जळगाव  ः जिल्ह्यात चाळीसगाव, पाचोरा, जामनेर तालुक्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे रब्बीच्या गहू, ज्वारी, मका व हरभरा पिकांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे.  रविवारी (ता. १) अनेक भागांत हलका पाऊस झाला. तर शनिवारी (ता. २९) मध्यरात्री वादळानंतर ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. चाळीसगाव ः शहरासह परिसरात सायंकाळी साडेसातच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मध्यम पाऊस झाला. दिवसभर कडक ऊन होते. सायंकाळी काही भागांत विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडला.  कजगाव (ता. भडगाव) ः परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे कजगावसह तांदूळवाडी, मळगाव, भोरटेक आदी भागांतील पिकांना मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे. या भागात सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाल्याने सखल भागात पाणी साचले होते.  पाचोरा ः पाचोऱ्यासह नगरदेवळा, निंभोरी परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. गहू, बाजारी, ज्वारी, मका, हरभरा ही पिके कापणीवर आली असून ऐन तोंडी आलेला घास हातचा जातो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वीजपुरवठा अर्धा तास बंद झाला होता.  जामनेर शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. या पावसामुळे रब्बी हंगाम धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. सोमवारी (ता. २) ढगाळ वातावरण कायम होते. यामुळे उकाडाही वाढला आहे. पिकांना सिंचन करताना शेतकऱ्यांची धावपळ होत असून, केळी, पपई उत्पादकांनी ढगाळ वातावरणाचा धसका घेतला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com