Agriculture news in marathi Damage to crops due to rainfall in Nashik district | Agrowon

वादळी पावसाने रब्बी हंगामातील पिके आडवी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 मार्च 2020

नाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या पूर्वमोसमी पावसाने इगतपुरी, निफाड, देवळा, सिन्नर, मालेगाव, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, कळवण, सटाणा, दिंडोरी, नाशिक व येवला तालुक्यात हजेरी लावली. त्यामुळे काढणीस आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

नाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या पूर्वमोसमी पावसाने इगतपुरी, निफाड, देवळा, सिन्नर, मालेगाव, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, कळवण, सटाणा, दिंडोरी, नाशिक व येवला तालुक्यात हजेरी लावली. त्यामुळे काढणीस आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

अतिवृष्टीच्या फटक्यानंतर आता पाऊस झाल्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीच्या फेऱ्यात सापडले आहेत. रब्बी हंगामातील काढणीस आलेला गहू, हरभरा यांसह भाजीपाला व काढणीस आलेल्या द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

कोरोनाच्या भितीमुळे मजुरांमुळे शेतीकामे मंदावली आहे. त्यात या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सलग तासभर पाऊस झाला. सुरगाणा तालुक्यातील हतगड व बोरगाव परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पाऊस तुरळक झाला असला तरी शेतकरी चितेत आहेत. इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात वादळ वाऱ्यासह गारपीट झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

बेलगाव तऱ्हाळे, टाकेद, मायदरा, धानोशी, सोनोशी या भागात जोरदार पाऊस झाल्याने गव्हासह, टोमॅटो व इतर भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. खळ्यामध्ये काढून ठेवलेली पिके झाकण्यासाठी मोठी तारांबळ झाली होती. मालेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने सोंगणी केलेले पीक झाकण्यासाठी कसरत करत होते. 

या पावसामुळे शेतातील गहू, कांदा या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे कांदा पिकावर परिणाम होऊन कांदा साठवणी योग्य राहणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. येवला तालुक्यातील अंदरसूल, नगरसूल, अनकाई, पिंपळगाव जलाल, मानोरी, कातरणी, बोकटे, सायगाव आदी परिसरात पाऊस झाला. गहू सोंगणी, द्राक्ष, हरभरा, कांदा आदी पिके काढण्याचे काम सुरू असून, काढलेली पिके झाकण्यासाठी शेतकरी वर्गाची मोठी धावपळ झाली.

निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांचे पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अगोदरच अतिवृष्टी व महापुरामुळे गोदाकाठ परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यात या पावसामुळे रब्बी हंगामातील पिके व द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. देवळा तालुक्यातील लोहणेर परिसरात सुमारे पाऊण तास चाललेल्या पावसाने कांदा पिकाचे नुकसान केले. तर काढून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी शेतकरी वर्गाला धावपळ करावी लागली.

आधीच कोरोनाच्या सावटाखाली असलेले शेतकरी आता अवकाळीच्या चिंतेत सापडली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे. त्या ठिकाणचे संबंधित विभागाने तत्काळ पंचनामे करून तत्काळ भरपाई देण्याची मागणी होत आहे. 


इतर ताज्या घडामोडी
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...
अकोला जिल्हा परिषदेचा ७६ कोटींचा निधी...अकोला  ः ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या...
हिंगोली जिल्ह्यात ५९ कोटींचे पीककर्ज...हिंगोली   ः हिंगोली जिल्ह्यातील विविध...
कापूस, सोयाबीन उत्पादक विमा...गडचिरोली: धान उत्पादक ३४ हजार शेतकऱ्यांना सुमारे...
नांदेडमध्ये ४७ कोटी ४७ लाखांचे पीक कर्ज...नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बॅंकांनी...
जालन्यात पाच हजार टन खते एकाच दिवशी...जालना  : जिल्ह्यात एकाच दिवशी पाच हजार...
कर्जमुक्‍ती योजनेची प्रक्रिया ३०...भंडारा ः शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव...
जयपूरमध्ये वीज पडून लाखो रुपयांच्या...नाशिक : पूर्वमोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर बागलाण...
बुलडाणा जिल्ह्यात १५ तारखेपर्यंत...बुलडाणा  : यंदा जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पाऊस...
भाजीपाल्याची थेट खरेदी विक्री व्यवस्था...पुणे ः कोरोना टाळेबंदीमध्ये शहरातील विविध भागात...
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीसातारा ः जिल्ह्यात सोमवारी सर्वदूर पावसाने हजेरी...
कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांचा रास्तारोकोयवतमाळ ः महागाव तालुक्‍यातील गुंज येथील...
पुणे जिल्ह्यात पीककर्ज वितरणात...पुणे ः लाॅकडाऊनच्या काळात होरपळून निघालेल्या...