Agriculture news in marathi, Damage to crops due to soaking in rain | Agrowon

नांदेड : पावसात भिजल्यामुळे पिकांचे नुकसान

टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

दुबार पेरणी करावी लागली असून त्यानंतर पाऊस उघडल्याने पिकांची वाढ खुंटली. ऐन काढणीच्या वेळी पावसात भिजल्याने सोयाबीन, कपाशीचे नुकसान झाले. डागील मालामुळे व्यापारी कमी भाव देत आहेत.
- अरुण जाधव, कुडली, ता. देगलूर, जि. नांदेड.

वादळी वारे, गारपिटीमुळे हळदीची पाने फाटल्याने झिरमाळ्या झाल्या आहेत. कंद भरण्याच्या अवस्थेत पाने फाटल्याने उत्पादनात 
मोठी घट येईल. 
- प्रल्हाद बोरगड, सातेफळ, ता. वसमत, जि. हिंगोली.

अतिवृष्टीमुळे नदीचे पाणी शेतात शिरल्याने सोयाबीन, कपाशीची पिके पाण्याखाली गेली होती. जमिनी खरडून गेल्या. नुकसानीचे पंचनामे केले. शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी.
- पशुपतिनाथ शेवटे, सिरपूर, ता. पालम, जि. परभणी.

नांदेड : गेल्या आठवड्यात नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये  वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने काढणी केलेल्या, सोयाबीनच्या शेंगांना मोड फुटले आहेत. कपाशीची झाडे मोडून पडली. बोंडे सडली. गारपिटीमुळे हळदीच्या पानाच्यां झिरमाळ्या झाल्या. सोयाबीनचे दाणे डागील झाले. कापूस पिवळा पडला आहे. त्यामुळे कमी बाजारभावाने खरेदी केली जात आहे. परिणामी, शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या जून, जुलै, आॅगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला. परिपक्वेतच्या अवस्थेतील मूग, उडदाच्या उत्पादनात घट झाली; परंतु पोळा सणानंतर सप्टेंबर ते आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील नायगाव, बिलोली, देगलूर, अर्धापूर, लोहा, कंधार, मुखेड; तसेच अन्य काही तालुक्यांत, परभणी जिल्ह्यातील परभणी, सेलू, पूर्णा, पालम तालुक्यात, हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात त्यामुळे फटका बसला. 

काढणीच्या अवस्थेतील सोयाबीनचे पीक, कापणी करून शेतामध्ये ठेवलेले सोयाबीन भिजले. सतत पाण्यात राहिल्याने सोयाबीनच्या शेंगांना मोड फुटले. दाणे डागील झाले. गंजीमध्ये दडपून राहिल्याने शेंगांवर बुरशीची वाढ झाली. वादळी वाऱ्यामुळे बोंडे लगडलेले कपाशीचे पीक आडवे झाले. सखल भागात पाणी साचून राहिल्याने बोंडे सडली. अपूर्ण वाढ झालेली बोंडे काळवंडली. त्यातून फुटलेला कापूस पिवळा पडला. 

वसमत तालुक्यातील गारपिटीमुळे हळदीच्या पानांच्या झिरमाळ्या झाल्या. परभणी जिल्ह्यातील पालम आणि परभणी तालुक्यात नदी नाल्याचे पाणी शिरून सुमारे ४ हजारांहून अधिक हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांचे नुकसान झाले. अशा सोयाबीन, कापसाची प्रतिक्विटंल हजार ते दीड हजार रुपये कमी दराने व्यापारी खरेदी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. पावसामुळे बाधित पिकांची नुकसानभरपाई देण्याची मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...
नांदेड जिल्ह्यातील एक लाख ९२ हजार...नांदेड  ः यंदा जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार...
ओसंडून वाहतोय आडोळ प्रकल्पशिरपूरजैन, जि. वाशीम ः दमदार पावसामुळे येथील आडोळ...
काटेपूर्णा प्रकल्प तुडुंब, पाणी साठ्यात...अकोला ः यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत वेगवेगळ्या...
अकोला जिल्ह्यात युरिया खताचा वापर वाढलाअकोला ः जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत...
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुलेचकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील...
नाशिक शहरात बैलपोळा साहित्याच्या...नाशिक : गेल्या वर्षांपासून शेतीमालाचे नुकसान व...
मालेगाव तालुक्यात भाजीपाल्यासह खरीप...नाशिक : मालेगाव तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या...
येलदरीच्या दोन दरवाजातून विसर्गपरभणी : बुलडणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील...
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलासांगली ः जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे....
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...