लासलगाव परिसरातील मोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान

लासलगाव परिसरातील मोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान
लासलगाव परिसरातील मोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान

नाशिक  : लासलगाव शहर तसेच परिसरात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. अनेकांचा रोजगार शेतीवर अवलंबून आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून परिसरात मोकाट गायी, वळू व वासरे यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे उभ्या पिकात व बाजार समितीत घुसून नुकसान तसेच वाहतुकीच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन होळकर यांनी लासलगाव व परिसरातील मोकाट जनावरांच्या समस्येबाबत निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन सादर केले आहे.  लासलगाव परिसरात पाचशेच्या आसपास मोकाट जनावरे असण्याची शक्यता आहे. ही जनावरे टोळक्याने शेतात येतात आणि उभ्या पिकाची संपूर्ण नासाडी करतात. यापूर्वी जनावरांना हुसकावण्यासाठी जाणाऱ्यांवरदेखील जनावरांनी हल्ले केले आहेत. काही दिवसांपूर्वी अशाच एका हल्ल्यात लासलगाव येथील एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाला होता. शेतीप्रमाणेच शहरातील दुकानदार, कृषी उत्पन्न बाजार समितीमधील वाहनांना भाजीपाला मार्केटमध्ये तसेच शहरातील वाहतुकीला प्रचंड अडथळा अशी जनावरे निर्माण करतात. त्यामुळे छोटे-मोठे अपघात नियमित घडत असतात. यापूर्वी स्थानिक प्रशासनाला अनेकदा निवेदन देऊनही याबाबत काहीच दखल घेण्यात आलेली नाही. कोणतीही ठोस कारवाई झाली नाही  निवासी उपजिल्हाधिकारी श्री. डोईफोडे यांनी निवेदन देऊन ही समस्या सोडविण्यासाठी लक्ष वेधले आहे. या दिलेल्या निवेदनासोबत लासलगाव आणि परिसरातील जवळपास 100 ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास मोठे जनआंदोलन उभे करण्यात येईल, असा इशारा श्री सचिन यांनी दिला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com