Agriculture news in marathi, Damage of crops in Nashik district over six and half lakh hectares | Agrowon

नाशिक जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान

टीम अॅग्रोवन
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

नाशिक : ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने पूर्ण केले. सुमारे दोन हजार गावांमधील तब्बल साडेसहा लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. यात जिरायती क्षेत्राची ९७ टक्के हानी झाली आहे. मका, सोयाबीन, बाजरी, द्राक्ष आणि कांद्याला सर्वाधिक फटका बसला आहे. तब्बल सात लाख ७६ हजार ९७० शेतकरी बाधित झाले आहेत. प्रशासनाच्या आढाव्यात सव्वातीन लाख हेक्टरचे प्राथमिक नुकसान झाल्याचे समोर आले होते. प्रत्यक्षात मात्र, हे नुकसान दुप्पट असल्याचे स्पष्ट झाले.

नाशिक : ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने पूर्ण केले. सुमारे दोन हजार गावांमधील तब्बल साडेसहा लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. यात जिरायती क्षेत्राची ९७ टक्के हानी झाली आहे. मका, सोयाबीन, बाजरी, द्राक्ष आणि कांद्याला सर्वाधिक फटका बसला आहे. तब्बल सात लाख ७६ हजार ९७० शेतकरी बाधित झाले आहेत. प्रशासनाच्या आढाव्यात सव्वातीन लाख हेक्टरचे प्राथमिक नुकसान झाल्याचे समोर आले होते. प्रत्यक्षात मात्र, हे नुकसान दुप्पट असल्याचे स्पष्ट झाले. नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला असून आता शेतकऱ्यांचे डोळे मदतीकडे लागून आहेत.

जिल्हा प्रशासनाने कृषी व इतर यंत्रणांच्या सहाय्याने जिल्ह्यातील पंचनाम्यांची कामे हाती घेतली. परंतु, बहुतांश शेतांमध्ये दोन ते तीन दिवस पाणी साचून असल्याने प्रशासनाला पंचनामे करताना अडचणी आल्या. त्यामुळे या हंगामातील परिणाम रब्बी हंगामावर होण्याची दाट शक्यता आहे. 

भरपाईसाठी ६३६ कोटींची मागणी

जिल्हा प्रशासनाने पंचनाम्यांचा अहवाल राज्य स्तरावर सादर केला. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने राज्यपालांनी नियुक्‍त केलेल्या सल्लागार मंडळाच्या हाती राज्याचा कारभार असणार आहे. परिणामी, नुकसानभरपाईबाबत प्रश्‍नचिन्ह उभे ठाकले आहे. मात्र, हा पाऊस नैसर्गिक आपत्ती असून, शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्यासाठीची शिफारस राज्यपालांकडे करू शकते. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत मिळण्यात तूर्तास कोणतीही अडचण नसल्याची माहिती प्रशासनाने दिली. 

जिल्ह्यातील एकूण नुकसान 

पिके गावे बाधित शेतकरी क्षेत्र (हेक्टर) मदतीची मागणी  
जिरायत पीक  १,९५८ ५,५३, ४८४  ४०९२७५.८१ २७८ कोटी ३० लाख 
बागायती पीक १,३६१   २,३०,०७१ १५६३५०.७१ २११ कोटी ७ लाख 
फळपीक १, २१५  १,०४,३६५    ८१६८९.०९ १४६ कोटी ८५ लाख 
एकूण १, ९५९ ७, ७६, ९७० ६४७३१५.६६ ६३६ कोटी २३ लाख

 


इतर ताज्या घडामोडी
 शेतकरी केंद्रित अर्थसंकल्पाचा दावा फोलकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १...
वीज बिले न भरण्याचा ‘स्वाभिमानी’चा...सातारा  ः जावळवाडी (ता. सातारा) येथील मुख्य...
कोकणासह नवा महाराष्ट्र घडवूया :...रत्नागिरी  ः आकडा सांगण्यापेक्षा कृतीला...
कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी आता...नाशिक  : केंद्र सरकारने निर्यातबंदी केल्याने...
भाजपचे राज्यात २५ ला धरणे आंदोलन :...मुंबई : भारतीय जनता पक्ष येत्या मंगळवारी (ता. २५...
सांगलीत साडेसहा हजार शेतीपंपांच्या वीज...सांगली  ः  जिल्ह्यातील २०१८ पूर्वीच्या...
‘वनामकृवि’त सोयाबीनच्या पैदासकार ...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...
बोंडारवाडी धरणप्रश्नी मेढा येथे आंदोलनमेढा, जि. सातारा : बोंडारवाडी धरण झालेच पाहिजे,...
ज्वारी उत्पादन यंदाही आतबट्ट्यातचनगर ः दोन वर्षं दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर यंदा...
जांभुळणी तलावाच्या कालव्याला गळतीखरसुंडी, जि. सांगली : जांभुळणी (ता. आटपाडी) येथील...
महिला शक्‍तीतूनच नवसमाजाची जडणघडण  ः...अमरावती  ः ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती...
सोलापूर जिल्ह्यातील पाच नळपाणी योजना...सोलापूर : प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी...
परभणी जिल्ह्यात फळबागेची ६३९ हेक्टरवर...परभणी : यंदा सिंचन स्त्रोतांना पाणी उपलब्ध आहे....
आंबेगाव तालुक्यात प्रतिकूल हवामानामुळे...निरगुडसर, जि. पुणे ः यंदा हवामानातील बदल व...
नगर जिल्ह्यात ४८ हजार हेक्टरवर चारा...नगर : जिल्ह्यात यंदा पाण्याची बऱ्यापैकी...
जळगाव जिल्ह्यात तूर विक्रीबाबत ८००...जळगाव  ः जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीने...
पपई १४.५५ रुपये प्रतिकिलो शहादा, जि. नंदुरबार  : पपई उत्पादक शेतकरी व...
शेतीपंपांचा वीज वापर १६ टक्के; दाखविला...अकोला  ः शेतीपंपांचा वीज वापर १६ टक्केच होत...
कोल्हापुरात गवार, घेवड्याच्या दरात...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाला उठाव, दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...