Agriculture news in marathi Damage to crops by stormy winds | Agrowon

कायगावात वादळी वाऱ्याने पिके भुईसपाट

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 मार्च 2020

कायगाव, जि. औरंगाबाद : वादळी पावसाने शेतकऱ्यांची अवकाळा होत आहे. पावसात अमळनेर शेतवस्तीवरील सुधाकर हुसाळे यांच्या राहत्या झोपडीवजा घराचे छप्पर वादळी वाऱ्याने उडून गेले. तर चंपानंद साळवे यांच्या घरावरील टिनपत्रे उडाली. त्यामळे त्यांना रात्र थंडी गारठ्यात पावसात भिजून काढावी लागली. त्यात अन्नधान्य भिजल्याने चूल बंद झाली.

कायगाव, जि. औरंगाबाद : वादळी पावसाने शेतकऱ्यांची अवकाळा होत आहे. पावसात अमळनेर शेतवस्तीवरील सुधाकर हुसाळे यांच्या राहत्या झोपडीवजा घराचे छप्पर वादळी वाऱ्याने उडून गेले. तर चंपानंद साळवे यांच्या घरावरील टिनपत्रे उडाली. त्यामळे त्यांना रात्र थंडी गारठ्यात पावसात भिजून काढावी लागली. त्यात अन्नधान्य भिजल्याने चूल बंद झाली.

अगोदरच ‘कोरोना’च्या भितीमुळे घरदार न सोडल्यामुळे शेतमजूर लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात गुढी पाडव्याच्या सणासुदीच्या दिवशी अचानक आलेल्या पावसाने अनेकांची अवकळा केली. कायगाव (ता. गंगापूर) परिसरात बुधवारी (ता. २५) रात्री सातच्या सुमारास विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काढणीस आलेला गहू, कांदा, ज्वारी, हरभरा आदी पिके भिजून मोठे नुकसान झाले आहेत. 

कायगाव, अमळनेर, लखमापूर, गणेशवाडी, गलनिंब, भिवधानोरा, अगरवाडगाव, पखोरा, जामगाव, ममदापूर, बगडी, अगरकानगाव, भेंडाळा या भागात बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. अखेर सायंकाळी सातच्या सुमारास वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह मध्यम ते हलक्या स्वरूपाचा एक ते दीड तास पाऊस झाला. त्यामुळे काढणी आलेला गहू, कांदा, हरभरा, ज्वारी भिजून शेतमालाचे मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे मोठमोठी झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी वीज तारा, खांब तुटून पडले. त्यामुळे रात्रभर वीज पुरवठा खंडीत झाला होता.

फळ पिकांना मोठा फटका बसला
आंब्याचा मोहोर देखील गळून पडला आहे.  वाऱ्याने चिकू, पपई, मोसंबी, लिंबू झाडाखाली पडून प्रचंड नुकसान झाले आहे. गुरुवारी (ता. २६) दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी पुन्हा पाऊस येईल या भितीने शेतकऱ्यांनी शेतात काढणी केलेला कांदा ताडपत्रीने झाकून ठेवण्यासाठी धावपळ केली. आधीच ‘कोरोना’च्या भीतीने सर्व जण दहशतीच्या छायेत आहेत. त्यात अवकाळी पावसाने चांगलेच नुकसान केले आहे. एकंदरीत ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले असून लोक मेटाकुटीला आले आहेत.


इतर ताज्या घडामोडी
राज्यात कोरोनामुळे आणखी दोन मृत्यू;...पुणे: राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या...
वऱ्हाडात पूर्वमोसमी पावसाचा पुन्हा तडाखाअकोला  ः  वऱ्हाडातील काही भागांत...
‘कोरोना’ मुकाबल्यासाठी अकोल्यात टास्क...अकोला ः कोरोना विषाणूमुळे लागू असलेल्या...
‘कोरोना’विरुद्धचा लढा मानवजातीच्या...मुंबई: ‘कोरोना’विरुद्धचा लढा राज्य, देशांच्या...
फुलंब्री, भोकरदन तालुक्यात गारपीट;...औरंगाबाद/जालना : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील...
बुलडाण्यात ‘कोरोना’बाधिताचा मृत्यू;...बुलडाणा : जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधिताचा मृत्यू...
नाशिकमध्ये आढळला कोरोनाबाधित रुग्ण नाशिक : जिल्ह्यात ‘कोरोना’चा रुग्ण आढळून...
नाशिक : ‘सह्याद्री’ उपलब्ध करुन देणार...नाशिक : शेतकऱ्यांनी एकत्र येत सुरू केलेली...
सातारा जिल्ह्यात सात लाख मेट्रीक टन ऊस...सातारा ः जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम...
खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा...
कोरोनाच्या माहिती संकलनासाठी ऑनलाईन...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
सोलापुरात वैद्यकीय सामग्री खरेदीसाठी...सोलापूर  : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
पुणे जिल्हा बॅंकेकडून पीक कर्ज...पुणे ः शेतकऱ्यांना पीक कर्जाची परतफेड करण्यासाठी...
जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी विरोधात...नाशिक : जीवनावश्यक वस्तूंची विक्री करतांना...
अकोला जिल्ह्यात फूलशेतीचे झाले मातेरेअकोला ः जिल्ह्यात फूलशेतीचे माहेरघर म्हणून...
मोर्शीत हमीभावाने तूर खरेदी रखडलीअमरावती ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव...
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेतील आर्थिक...नांदेड  : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणीत घरपोच भाजीपाला विक्री ठरतेय...परभणी ः मिरखेल आणि देशमुख पिंपरी येथील...
विदर्भात फुलांची उलाढाल ठप्पनागपूर  ः बंद काळात फळे, भाजीपाला...
तिडे येथे १४५ एकरांवरील कलिंगडे...चिपळूण, जि. रत्नागिरी  ः मंडणगड तालुक्यातील...