Agriculture news in marathi Damage to crops by stormy winds in walsawangi | Agrowon

वालसावंगी परिसरात पावसाने पिके आडवी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 एप्रिल 2020

वालसावंगी, जि. जालना : ‘कोरोना’चे मोठे संकट डोक्यावर असताना आता अवकाळी पाऊस व जोराच्या वाऱ्याने शेतकऱ्यांना मोठा फटका दिला असून हातातोंडाशी आलेला रब्बी पिकांचा घास खरीप हंगामातील पिकांप्रमाणे हातातून हिसकावून नेला आहे.

वालसावंगी, जि. जालना : ‘कोरोना’चे मोठे संकट डोक्यावर असताना आता अवकाळी पाऊस व जोराच्या वाऱ्याने शेतकऱ्यांना मोठा फटका दिला असून हातातोंडाशी आलेला रब्बी पिकांचा घास खरीप हंगामातील पिकांप्रमाणे हातातून हिसकावून नेला आहे.

वालसावंगी परिसरात मंगळवारी (ता. ३१) सायंकाळी पाऊण तास मुसळधार पावसाने हजेरी लावली. या वेळी पावसासोबत वारा देखील जोराचा होता. जोराचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे शेतातील बहरलेली मका, गहू, बाजरी ही पिके पाऊस व हवेमुळे आडवी झाली. खरीप पिकांप्रमाणे रब्बी पिकाचा देखील घात पावसामुळे झाला आहे. दरम्यान आजच्या पावसामुळे शेतशिवारात मोठे नुकसान झाले असून तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आजच्या पावसामुळे गावातील रस्त्यावर पाणीच पाणी व्हायला लागले होते. विक्रीसाठी आणलेला भाजीपाला देखील पावसात भिजला. तसेच अनेक शेतकरी, व्यापाऱ्यांची लाल मिरची देखील पावसात भिजली. यामुळे सुद्धा मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. गावातील काही घरांवरील पत्रे देखील जोरदार हवेमुळे खाली पडली होते. 

शेतकरी दिलीप आहेर म्हणाले की, यंदा एक एकर क्षेत्रात गव्हाची लगवड केली होती. गहू चांगला आला होता. काही दिवसांनी सोंगणी करण्यात येणार होती. मात्र, सोंगणी पूर्वीच गहू आजच्या पाऊस व वाऱ्यामुळे जमिनीवर पडला असून यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

शेतकरी नारायण बोराडे म्हणाले की, एक तर ‘कोरोना’च्या धास्तीखाली जगावे लागते आहे. दुसरीकडे पाऊस देखील मुळावर उठला आहे. खरीप पिके अगोदर नष्ट केली आणि आता रब्बी पिकाचे नुकसान केले आहे. माझ्या शेतातील मका पूर्णतः जमिनीवर पडली असून नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
ऊसतोड मजुरांचा विमा सरकारने उतरवावा नगर ः राज्यात सध्या कोरोना व्हायरस संसर्ग वाढत...
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
दूध, अंडी ः मानवी आहारासाठी उपयुक्तआपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते...
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...