Agriculture news in marathi Damage due to inferior seeds of flower in chanda | Agrowon

चांद्यात फ्लॉवरच्या निकृष्ट बियाण्यांमुळे नुकसान

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

नगर : तेलंगण राज्यातील एका बियाणे कंपनीचे फ्लॉवरचे बियाणे खरेदी करून लागवड केली. मात्र, ते बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याने फ्लॉवर पीक आलेच नाही. त्यामुळे चांदा (नेवासा) येथील काही शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबाबत चौकशी करून कृषी विभागाचे अधिकारी, गुणनियंत्रण पथक, बियाणे विक्रेत्यावर कारवाई करावी, संबंधित कंपनीच्या विक्रीला महाराष्ट्रात बंदी घालावी, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली. याशिवाय महाराष्ट्र शेतकरी मराठा महासंघाने कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे लेखी स्वरूपात मागणी केली.

नगर : तेलंगण राज्यातील एका बियाणे कंपनीचे फ्लॉवरचे बियाणे खरेदी करून लागवड केली. मात्र, ते बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याने फ्लॉवर पीक आलेच नाही. त्यामुळे चांदा (नेवासा) येथील काही शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबाबत चौकशी करून कृषी विभागाचे अधिकारी, गुणनियंत्रण पथक, बियाणे विक्रेत्यावर कारवाई करावी, संबंधित कंपनीच्या विक्रीला महाराष्ट्रात बंदी घालावी, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली. याशिवाय महाराष्ट्र शेतकरी मराठा महासंघाने कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे लेखी स्वरूपात मागणी केली.

जिल्ह्यामधील चांदा (ता. नेवासा) येथील काही शेतकरी सातत्याने भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. यंदा साधारण दोन ते तीन हजार शेतकऱ्यांनी फ्लॉवर लागवड करण्यासाठी तेलंगण राज्यातील बियाणे कंपनीच्या फ्लॉवरची बियाणे नगर येथील दुकानातून खरेदी करून त्याची लागवड केली. मात्र, निर्धारित काळात लागवड केलेल्या फ्लॉवरच्या झाडाला पीकच आले नाही. त्यानंतर निकृष्ट व बनावट बियाण्यांमुळे असा प्रकार झाला. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केली. मात्र, कृषी विभागाने फारसे गांभीर्याने घेतले नाही. 

दरम्यान, महाराष्ट्र शेतकरी मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पीकपाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर महासंघाच्या प्रदेशाध्यक्षांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. बनावट बियाणे, कीटकनाशकांची सर्रास विक्री होत असताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी तपासणी करीत नसल्याचे दिसून येत आहे.

चांदा येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीला कारणीभूत सर्व बाबींची आणि अधिकाऱ्यांची चौकशी करून कृषी विभागाचे अधिकारी, गुणनियंत्रण पथक, बियाणे विक्रेत्यावर कारवाई करावी, संबंधित कंपनीच्या विक्रीला महाराष्ट्रात बंदी घालावी, अशी मागणी महासंघातर्फे भुसे यांच्याकडे करण्यात आली. 

योग्य कारवाई होणार

दरम्यान, पीक आले नसल्याबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत. त्याची तालुका कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांचे पथक तपासणी करत आहे. योग्य ती कारवाई होईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांनी सांगितले. 
 


इतर ताज्या घडामोडी
‘चांगभलं’च्या जयघोषाविना यंदा जोतिबाची...जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर ः कोरोना आणि...
नक्षलवाद्यांनीही घेतला कोरोनाचा धसका;...मुंबई : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत...
मुंबईत हापूसची आवक वाढली; ५ डझन पेटीस...मुंबई : वाहतुकीतील अडथळे दूर केल्याने मुंबई कृषी...
नांदेड जिल्ह्यात गारपीटीमुळे पिके...नांदेड : जिल्ह्यातील ४० मंडळांमध्ये मंगळवारी (ता....
इचलकरंजीत विक्रेत्यांकडून चाराविक्रीचे...कोल्हापूर : वैरण बाजारात चारा विक्रेत्यांनी...
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी...नांदेड :‘‘‘लॅाकडाऊन’मुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या...
चाकूर तालुक्यात गारपीटीने पिके,...चापोली, जि. लातूर : चाकूर तालुक्यातील धनगरवाडी व...
बंदीवानांनी पिकवला भाजीपालाअकोला ः येथील जिल्हा कारागृहात असलेल्या शेतीत...
नांदेड जिल्ह्यात सहा हजार क्विंटल...नांदेड : ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी लॅाकडाऊन...
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची पावणे...औरंगाबाद : ‘‘राज्य कापूस पणन महासंघातर्फे...
अकोला पाणी टंचाईच्या उपाययोजना खोळंबल्याअकोला ः एकीकडे लॉकडाऊन तर दुसरीकडे ग्रामीण भागात...
अकोला बाजार समितीत गव्हाची टोकन...अकोला ः ‘कोरोना’ विषाणू प्रतिबंधात्मक...
वाडेगावमध्ये शेतकऱ्यांकडून मोफत...अकोला ः सध्याच्या परिस्थितीत नागरिकांना सहकार्य...
लॉकडाऊनमुळे ओझोनचा थर भरतोय का?सध्या सर्वत्र एक चर्चा सुरू आहे, ती म्हणजे ओझोनचा...
हिंगणघाट तालुक्‍यात सीसीआयकडे थकले...वर्धा ः सीसीआयला कापूस देणाऱ्या हिंगणघाट तालुक्‍...
नेरच्या शेतकऱ्यांची सोन्यासारखी फुले...देऊर, जि. धुळे : जगासह देशात ‘कोरोना’ विषाणूने...
विदर्भात कोरोना बाधितांची संख्या पोचली...नागपूर ः बुलडाणा, अमरावती नंतर नागपुरातील पहिल्या...
पुणे बाजार समितीत ३२५ वाहनांमधून...पुणे : शहरात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या...
इंदापुरातील मच्छीमारांवर उपासमारीची वेळपुणे  ः  कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू...
`कोरोना`च्या पार्श्वभूमीवर पुणे...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खबरदारी...