नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान

नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर ढगाळ वातावरण होते. यात प्रामुख्याने सकाळी लवकर कसमादे पट्ट्यात पावसाला सुरुवात झाली.
Damage due to storm in eastern part of Nashik
Damage due to storm in eastern part of Nashik

नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर ढगाळ वातावरण होते. यात प्रामुख्याने सकाळी लवकर कसमादे पट्ट्यात पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर नाशिक शहरासह सिन्नर, निफाड, चांदवड भागातही हलक्या सरी बरसल्या. मात्र जिल्ह्याच्या पूर्व भागात येवला तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. 

सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वतावरणासह गारवा निर्माण झाला. त्यात प्रामुख्याने कसमादे भागात चांगला पाऊस झाला. देवळा तालुक्यात भऊर, विठेवाडी, सावकी, खामखेडा या परिसरात काही गावांमध्ये शेतात पाणी साचले. सटाणा तालुक्यात सर्वच भागात मध्यम हलक्या सरी बरसल्या. पश्चिम आदिवासी पट्ट्यात पावसाचे प्रमाण अधिक होते. कळवण तालुक्यातही हीच परिस्थिती होती. मालेगाव तालुक्यातही मध्यम हलक्या स्वरूपाचा पाऊस झाल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. 

जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, इगतपुरी या भागातही हलक्या स्वरूपाचा पाऊस झाल. दुपारनंतर सिन्नर तालुक्यातील अनेक भागात काही ठिकाणी पावसात वाढ झाली. तसेच वाऱ्याची गतीही वाढत गेली. त्यामुळे भितीचे वातावरण होते. दिंडोरी व निफाड तालुक्यातील अनेक भागात हलक्या सरी बरसल्या. तर, दुपारपर्यंत गोदाकाठ परिसरात हवेत गारवा होता. चांदवड तालुक्यातही अनेक भागात वाऱ्यासह हलक्या सरी बरसल्या. ढगात वेगवान हालचाली दिसून आल्या. दुपारनंतर नाशिक शहरात प्रामुख्याने ढग पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहताना दिसून आले. वाऱ्याचा वेग वाढल्याबरोबर पाऊस वाढल्याचे पाहायला मिळाले. 

निसर्ग चक्री वादळाच्या बातम्या कानावर आल्याने शेतकरी सावध आहेत. मात्र, कुक्कुटपालक, गोपालक, द्राक्ष व कांदा उत्पादकांमध्ये भितीचे वातावरण कायम आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन शेतकरी करत असून खबरदारी घेत आहेत.  अंदरसुल मंडळात पोल्ट्रीला फटका 

वाऱ्याचा वेग अधिक असल्याने वादळाच्या तडाख्यात ठराविक ५०० मीटर परिसरात मोठे नुकसान झाले. यामध्ये धामणगाव शिव परिसरात गजानन देशमुख यांच्या गट क्र.५५१/१ येथील २०० बाय ३१ फूट क्षेत्रावरील पोल्ट्री शेडचे नुकसान झाले. शेडमध्ये साडे चार हजार पक्षी असताना सर्व पत्रे उडून गेले. त्यामुळे २१ लाखांचे नुकसान झाल्याचा दावा देशमुख यांनी केला. यात दोन हजार पक्षी मृत झाले आहेत. साहेबराव जाधव यांच्या घराचे पत्रे व जनावरांच्या शेडचे पत्रे उडाले. तसेच घर, कांदा चाळ, जनावरे व पोल्ट्री शेडचे पत्रे उडाले. अनेक झाडे याभागत उन्मळून पडली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com