agriculture news in Marathi, Damage to farmers by storm wind in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे नुकसान
टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 एप्रिल 2019

नाशिक : वादळी पावसामुळे शुक्रवारी (ता. १२) नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. देवळा तालुक्याच्या पूर्वभागात अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले होते. अचानक वादळी वाऱ्यासह तुरळक पावसाला सुरवात झाली. त्यात येथील मिलिंद राणे यांचे स्टेट बँकेचे २० लाखांचे कर्ज घेऊन बांधलेले पॉलिहाउस व शेड नेटचे चार ते साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले. तसेच, शेतकऱ्यांनी कांद्याचे बियाणे तयार करण्यासाठी लावलेले डोंगळे ही वाऱ्याने भुईसपाट झाले. काढणी करून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी मोठी तारांबळ उडाली.

नाशिक : वादळी पावसामुळे शुक्रवारी (ता. १२) नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. देवळा तालुक्याच्या पूर्वभागात अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले होते. अचानक वादळी वाऱ्यासह तुरळक पावसाला सुरवात झाली. त्यात येथील मिलिंद राणे यांचे स्टेट बँकेचे २० लाखांचे कर्ज घेऊन बांधलेले पॉलिहाउस व शेड नेटचे चार ते साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले. तसेच, शेतकऱ्यांनी कांद्याचे बियाणे तयार करण्यासाठी लावलेले डोंगळे ही वाऱ्याने भुईसपाट झाले. काढणी करून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी मोठी तारांबळ उडाली. तर जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा इतरत्र उडून गेल्याने पशुपालकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बाबावाडी येथील ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह कार्यक्रमाचा मंडप उडाला. पावसाच्या वातावरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

सिन्नर तालुक्यातील (ता. १२) नांदूरशिंगोटे, कणकोरी, खंबाळे, देवपूर, भोकणी, पांगरी, वावी, मीरगावसह पूर्व भागात वादळी वाऱ्यासह सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तुरळक पाऊस झाला. पावसापेक्षा वादळ अधिक असल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले. काही भागांत पावसाचा जोर अधिक असल्याने शेतांमध्ये पाणी साचल्याचे चित्र होते. देवपूर फाटा परिसरात काही प्रमाणात गारादेखील झाल्याचे समजते. मीरगाव शिवारातील प्रकाश नामदेव शेळके यांच्या बॉयलर कोंबड्यांच्या तीन पोल्ट्री फार्मचे सिमेंट पत्रे उडाले. यात सिमेंट पत्र्यांचे मोठे नुकसान झाले. या शेडमध्येच शेळके कुटुंब राहते; परंतु हे कुटुंब यातून बचावले. 

प्रकाश शेळके हे सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोल्ट्रीफार्मकडे जात असताना पत्र्याचा तुकडा त्यांच्या हातावर येऊन आदळला. त्यात त्यांना जखम झाली. वाऱ्यामुळे एका पोल्ट्रीफार्मचे अतोनात नुकसान झाले. यातील सुमारे पाचशे कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. बाकीच्या कोंबड्या त्या दुसऱ्या पोल्ट्रीफार्ममध्ये रात्री स्थलांतरित केल्या. तीनही फार्ममध्ये जवळपास बारा हजार कोंबड्या होत्या. शेळके यांचे दहा लाखांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे.

इतर बातम्या
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...
कोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त...सातारा  ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची...पुणे  : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर...
`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची...न्हावरे, जि. पुणे   ः पावसाळा सुरू होऊन...
विद्राव्य खतांना अनुदान देण्याची मागणीकापडणे, जि. धुळे   ः विद्राव्य खतांना...
नगर जिल्ह्यात पाचशे वैयक्तिक पाणीयोजना...नगर  ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला;...
सोलापुरात कृषी विभाग शेतकऱ्यांना देणार...सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने...
जळगाव बाजार समितीत ज्वारी, बाजरी,...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी...रत्नागिरी  ः नाणार येथे ग्रीन रिफायनरी...
मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल ः...नाशिक  : मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल...
द्राक्ष शेतीत संघटनात्मक कार्यपद्धती...नाशिक : जागतिक द्राक्ष निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा...
बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळी स्थितीचा...नांदुरा, जि. बुलडाणा   ः तालुक्यात...
शेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...
कर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...
पीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...
ग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...
दुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...
राज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...