वऱ्हाडात पावसाने पिकांसह घरांचे नुकसान

चान्नी शिवारातील आमच्या शेतात सद्यस्थितीत उन्हाळी पेरूला बहार धरला होता. आठवडाभराने ही फळे काढणीला येणार होती. परंतु या वादळी पावसाने पेरू फळांचा सडा जमिनीवरपसरलेला दिसून आला. तसेच शेतात बसविलेल्या सौर ऊर्जा पंपाच्यासेटवरील सौर प्लेट वाकल्या इतका वाऱ्याचा जोर होता. कृषी विभागाने तातडीने सर्व्हे करून नुकसान भरपाई द्यावी. - स्नेहलता इंगळे, शेतकरी, चान्नी, ता. पातूर जि. अकोला
Damage to houses due to rain in Warhad
Damage to houses due to rain in Warhad

अकोला : वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी पुन्हा एकदा पावसाने पिकांची दाणादाण उडविली. मंगळवारी (ता.३१) झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे गहू, हरभरा, कांदा, लिंबू, भाजीपाला, संत्रा पिकांचे नुकसान झाले.  

अकोला जिल्हयात पातूर, बार्शीटाकळी, बुलडाणा जिल्‍ह्यात चिखली, खामगाव, मेहकर या तालुक्यांमध्ये काही ठिकाणी पूर्व मोसमी पावसाने जोरदार हजेरी दिली. मंगळवारी दुपारी चार वाजेनंतर वादळी वाऱ्यासह पातूर तालुक्यातील चान्नी परिसरात गारपीट झाले. यात शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. तासभर आलेल्या पावसाने लिंबू, सीताफळ, पेरू फळबागांच्या नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. 

पातूर तालुक्यातील सायवणी, सुकळी परिसरात मोठ्या प्रमाणात गार पडली. तसेच विवरा, चरणगाव मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडला त्यामुळे परिसरातील कलिंगड, खरबूज, लिंबू, पपई, भाजीपालावर्गीय पिके व तसेच कांदा पीक भुईसपाट झाले.

लागोपाठ दुसऱ्या दिवशी झालेल्या गारपिटीने तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. तर सायवणी येथे संजय ताले यांच्या शेतामधील कांद्याचे नुकसान झाले. याच तालुक्यात सुकळी, खेट्री, चतारी, चांगेफळ, शिरपूर, सावरगाव, उमरा, पांगरा आदी ठिकाणीही नुकसान झाले. 

बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथे या वादळाचा शेतांमधील पिकांना फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे पडली. तर घरावरील टीनपत्र्ये उडाल्याने नागरिकांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. पिंजर परिसरात भाजीपाला, लिंबू, संत्रा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पातूर तालुक्यातील विवरा परिसरात गारपीट झाली. मंगळवारी झालेल्या वादळी वाऱ्यांसह पावसामुळे विविध शेती पिके भूईसपाट झाले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com