Agriculture news in marathi, Damage kangar to ten hectares in Waitore | Agrowon

वेतोरेतील दहा हेक्टरवरील कणगरचे नुकसान

टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

गावाचे अर्थकारणच शेतीवर आहे. खरिपात सर्वच लोक भाजीपाला, चिबुड, कणगर अशी पिके घेतात. सध्या अनेक तरूण शेतीत उतरले आहेत. मात्र याव र्षीचा खरीप हंगाम पुर्णपणे वाया गेल्यामुळे शेती करायची की नाही, असा प्रश्‍न आहे.
- सुशांत नाईक, शेतकरी, वेतोरे, ता.वेंगुर्ला.

चिबुड पिकांचे नुकसान जुलै, ऑगस्टमध्येच झाले. त्यामुळे कणगर पिकांवर आमची भिस्त होती. मात्र ऐन काढणीच्या वेळी ऑक्टोबरमध्ये पाऊस झाला. त्यामुळे कणगरचे मोठे नुकसान झाले. ४० टक्के उत्पादनदेखील या वर्षी मिळाले नाही.
- धोंडू सांवत, शेतकरी, वेतोरे, ता.वेंगुर्ला.

सिंधुदुर्ग : जुलै, ऑगस्टमधील अतिवृष्टी आणि त्यानंतरच्या पावसामुळे जिल्ह्यातील वेतोरे (ता. वेंगुर्ला) परिसरातील दहा हेक्टरवरील कणगरचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, ते आता मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

वेंगुर्ला तालुक्यातील वेतोर या गावातील तरुणांचा मिश्रशेतीवर भर असतो. खरीप हंगामात या गावात भाजीपाल्यासोबत, चिबुड, कणगरची लागवड केली जाते. चिबुड पिकांचे जुलै, ऑगस्टच्या अतिवृष्टीतच नुकसान झाले. वेतोरे परिसरात सुमारे दहा हेक्टर क्षेत्र कणगर लागवडीखाली आहे. शेकडो शेतकरी दहा गुंठे, तर काही त्याहून अधिक कणगरची लागवड करतात. कणगरला गोव्यात मोठी मागणी आहे. साधारणपणे प्रतिकिलो कणगरला ६० रुपये दर मिळतो.

गणेशोत्सवानंतर हे पीक तयार होते. एक गुंठा क्षेत्रातून शेतकऱ्याला ३०० किलो कणगर मिळते. त्याला सरासरी ६० रुपये दर मिळतो. त्यामुळे प्रतिगुंठा १८ हजार रुपये उत्पादन होते. प्रतिगुंठ्याला सरासरी ११ हजार ५०० रुपये खर्च येतो. साधारणपणे या तीन महिन्यांत शेतकरी ६० ते ६५ हजार रुपये मिळवितो. ज्यांचे क्षेत्र मोठे आहे, ते अधिक नफा मिळवितात. १ कोटी ८० लाखांची उलाढाल फक्त कणगरपासून होते. परंतु यावर्षी ६० टक्के नुकसान झाले.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात कापसाच्या दरात किंचित...औरंगाबाद : खासगीत कापूस खरेदीचे दर किंचित...
परभणीत भाजपकडून वीजबिलांची होळी परभणी :  वाढीव वीज देयकांच्या निषेधार्थ...
खानदेशात ऊस लागवड वाढण्याची शक्यताजळगाव ः वाढती खासगी कारखानदारी व इतर...
जळगाव जिल्ह्यात कांदा बिजोत्पादन...जळगाव : जिल्ह्यात यंदा कांदा बिजोत्पादनाचे...
कलदगाव, नायगाव येथे कापूस खरेदी सुरु नांदेड  : भारतीय कपास निगमच्या (सीसीआय)...
अकोले बुद्रूकमध्ये वीज तारांच्या...सोलापूर ः विजेच्या खांबावरील विद्युत तारांचे...
सोलापूर जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक...सोलापूर ः जून ते डिसेंबर २०२० या कालावधीत...
कार्तिकी वारी कालावधीत गर्दी टाळा :...सोलापूर : ‘‘कार्तिकी वारी ही कोरोनाच्या...
नगरमधील ३२ मंडळात सरासरीच्या दुप्पट पाऊसनगर (प्रतिनिधी) : दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या...
पुणे जिल्हा परिषदेचे १७ शिक्षक...पुणे  - राज्यात शाळा सुरू करण्याच्या राज्य...
वीज जोडणी तोडण्यास आल्यास घेराव :...कऱ्हाड, जि. सातारा  : नागरिकांना शासनाने...
`वाढीव वीज बिले माफ न केल्यास तीव्र...मुंबई : वाढीव वीज बिलांच्या विरोधात भारतीय जनता...
शेतकरी आंदोलकांनी दिली सवलत; पंजाबमध्ये...नवी दिल्ली,  : केंद्र सरकारने तीन कृषी कायदे...
सांगलीत चार लाख जनावरांना लाळ खुरकूतचे...सांगली  : जनावरांच्या संभाव्य लाळ खुरकूत...
कृषी विद्यापीठातर्फे उन्हाळी सोयाबीनचे...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
अतिवृष्टीने फुले झडून गेल्याने तुरीच्या...सांगली  : जिल्ह्यात गेल्यावर्षीपेक्षा यंदा...
चारा पिकांकरिता पाणी आरक्षित करा :...वर्धा  : बोर प्रकल्पातील पाण्याचे नियोजन...
वान प्रकल्पाचे ‘पाणी’ तापू लागलेअकोला  : जिल्‍‍ह्यात तेल्हारा तालुक्यात...
कृषी सल्ला (कापूस, तूर, रब्बी ज्वारी,...मराठवाड्यात पुढील पाच दिवसांत आकाश स्वच्छ ते ढगाळ...
संत्राचे व्यवहार ११०० ते १४०० रुपये...नागपूर :  मागणीअभावी संत्रा दरातील तेजीची...