मालेगाव तालुक्यात भाजीपाल्यासह खरीप पिकांचे नुकसान

नाशिक : मालेगाव तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या दमदार पावसामुळे खरिपातील पिकांमध्ये पाणी साचून राहिले. त्यामुळे जोमात आलेली पिके मोठ्या प्रमाणावर बाधित झालीआहेत. त्यामुळे पिकांचे नुकसान झालेआहे.
Damage to kharif crops including vegetables in Malegaon taluka
Damage to kharif crops including vegetables in Malegaon taluka

नाशिक : मालेगाव तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या दमदार पावसामुळे खरिपातील पिकांमध्ये पाणी साचून राहिले. त्यामुळे जोमात आलेली पिके मोठ्या प्रमाणावर बाधित झाली आहेत. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. 

मागील सप्ताहात सलग तीन दिवस पाऊस झाला. त्यामुळे अद्यापही पाणी साचलेले आहे. ज्यामध्ये तालुक्यातील चिंचावड, आघार खुर्द, निंबोळा, आघार,पाटणे, डोंगरगाव, नांदगाव, आनंदवाडी, वाकी, टेहरे या भागात ही परिस्थिती आहे. सततच्या पावसामुळे मुळांची कार्यक्षमता मंदावून पिके पिवळी पडू लागली आहेत. प्रामुख्याने मका, बाजरी, सोयाबीन, भुईमूग ही पिके बाधित आहेत. यासह कापसाच्या लागवडी बाधित होऊन पाने पिवळी झाली आहेत.  टोमॅटो, वांगी, कोबी, शेवगा आदी भाजीपाल्याची पिके खराब झाली आहेत.

पावसामुळे टोमॅटोच्या लागवडीलाही फटका बसला आहे. परिसरात अनेक शेतकऱ्यांनी कोबी, वांगी, टॉमटोची लागवड केली. ही पिकेही खराब झाली आहेत. शेतकऱ्यांच्या व्यवस्थापन खर्चात वाढ झाली आहे. यासह नवीन खरीप कांद्याच्या रोपवाटीकाही मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्या आहेत. 

पंचनामे करण्याची मागणी

नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकरी महसूल विभागाकडे संपर्क करीत आहेत. मात्र, आदेश नसल्याचे सांगण्यात येते. म्हणणे विचारात घेण्यात येत नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. 

पिकांत पाणी साचल्याने ते बाहेर काढून देण्याबाबत सांगण्यात आले आहे. यासह फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. - दिलीप देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी, मालेगाव

मागील आठवड्यात पाऊस झाला. मात्र अजूनही शेतातील पाणी साचून आहे. त्यामुळे शेवगा, मका, बाजरी ही पिके खराब झाली आहेत. त्यामुळे मोठे नुकसान होणार आहे. यासह लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे.

- नंदराज सूर्यवंशी, शेतकरी, आघार खुर्द, ता. मालेगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com