agriculture news in marathi Damage of mangoes due to strong winds in Peth taluka | Agrowon

पेठ तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे  आंब्यांचे नुकसान 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 मे 2021

नाशिक : जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस व गारपिटीमुळे भाजीपाला पिकांसह काढणीस आलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले. तर पावसाने जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पेठ तालुक्यात सोमवारी (ता.३) हजेरी लावून आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.

नाशिक : जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस व गारपिटीमुळे भाजीपाला पिकांसह काढणीस आलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले. तर पावसाने जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पेठ तालुक्यात सोमवारी (ता.३) हजेरी लावून आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. वादळी वाऱ्यामुळे या भागातील २५ टक्के तयार होत असलेल्या कैऱ्या पडल्या. त्यामुळे आदिवासी भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. 

पेठ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आंब्याच्या लागवडी मोठ्या प्रमाणावर केल्या आहेत. त्यामध्ये केशर, हापूस, राजापुरी आंबा अधिक आहे. मात्र तालुक्यातील करंजाळी परिसराच्या १५ ते २० किलोमीटर परिसरात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस झाला. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तयार होत असलेल्या शेकडो एकर क्षेत्रावरील आंब्यांचे नुकसान झाले आहे. 

काही अंशी या भागातील शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा लागवडी केल्या आहेत. हा काढणीला आलेला कांदा पावसात भिजला आहे. यासह उन्हाळी बाजरी, भाजीपाला पिकांचे नुकसान अधिक आहे. दुपारी ३ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाऱ्याचा वेग कायम होता. या भागातील २५ टक्के आंब्याचे नुकसान झाल्याचे येथील प्रयोगशील शेतकरी यशवंत गावंडे यांनी सांगितले. 
 


इतर बातम्या
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे ...येवला, जि. नाशिक : कृषी बियाणे रासायनिक खते,...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करा ः...नागपूर : गेल्या वर्षीचा महापूर लक्षात घेऊन...
कुकडीच्या पाण्यासाठी  पारनेरकर एकवटले निघोज, ता. पारनेर : कुकडीच्या पाण्याबाबत पुणे...
पेट्रोल, खतांच्या दरवाढीविरोधात ...मुंबई : पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने...
गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांकडे नऊ टन...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात...
कीटकनाशके विक्रीबाबत तरतुदींचे पालन करा अकोला ः या खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके...
परभणीत पीककर्जाच्या उद्दिष्टात ४८६...परभणी ः जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२)...
कोरोना रुग्णालयांचा वीज,  ऑक्सिजन...मुंबई : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे...
मॉन्सूनपूर्व कामांना प्राधान्य द्यावे ः...भंडारा : मॉन्सून कालावधीत अचानक उद्‌भवणाऱ्या...
कोरोनाचे नियम पाळून  बाजार समित्या सुरू...नाशिक : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव...
नगर जिल्ह्यात खरीपपूर्व मशागतीच्या...नगर : एकीकडे कोरोनाचे सावट असताना ग्रामीण भागातील...
लोहा, माहूर तालुक्यांना विम्याची रक्कम...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...