भांबेडला एक हेक्टर भातशेतीचे नुकसान

लांजा तालुक्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला असून भांबेड येथील सुमारे पंधरा शेतकऱ्यांचे १ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले. जिल्ह्यात काही ठिकाणी भात कापणीला सुरुवात केली; मात्र पावसामुळे कापलेले भात वाळवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे.
Damage of one hectare of paddy field to Bhambed
Damage of one hectare of paddy field to Bhambed

रत्नागिरी ः जिल्ह्यात गेले दोन जोरदार पडत आहे. त्यामुळे भातशेतीची कापणी खोळंबली आहे. नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. लांजा तालुक्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला असून भांबेड येथील सुमारे पंधरा शेतकऱ्यांचे १ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले. जिल्ह्यात काही ठिकाणी भात कापणीला सुरुवात केली; मात्र पावसामुळे कापलेले भात वाळवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे.

जिल्ह्यात मंगळवारी (ता. २२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सरासरी १८.७९ मिलिमीटर पाऊस झाला. मंडणगड २०.५०, दापोली ११.८०, खेड २.९०, गुहागर २८.७०, चिपळूण ९.७०, संगमेश्‍वर २०.५०, रत्नागिरी ३२.३०, लांजा २८.१०, राजापूर १४.६० मिलिमीटरची नोंद झाली आहे.

१ जूनपासून आत्तापर्यंत सरासरी २५७६ मिलिमीटर नोंद झाली असून गतवर्षीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. गतवर्षी ४,१५३ मिलिमीटर पाऊस झालेला होता. सोमवारी दुपारपर्यंत ढगाळ वातावरण होते. सकाळी ऊन पडले होते; मात्र दुपारी पावसाने सुरुवात केली. मुसळधार पावसाची दणदणीत सर पडली. पुन्हा चार ते पाच तासांच्या विश्रांतीनंतर रात्री पावसाचा जोर वाढला. दिवसभरात विश्रांती घेत पडणाऱ्या या सरींनी बळीराजाच्या इच्छा आकांक्षांवर पाणी फेरले.

मुसळधार पावसाचा फटका लांजा (जि. रत्नागिरी) तालुक्याला बसला आहे. भांबेड येथील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. वहाळाला आलेल्या पुराचे आणि पावसाच्या पाण्यामुळे भातशेती पुर्णतः झोपली आहे. त्यातून उत्पादन मिळणेच अशक्य आहे. सुमार एक हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाले आहे. तलाठ्यांनी सायंकाळपर्यंत ११ शेतकऱ्यांचे पंचनामे केले आहेत. त्यात चिमाजी कुळ्ये, शंकर सोलकर, अनिता सोलकर, गजानन दिवाळे, दिलीप मडवी, अनंत मडवी, नामदेव दैत, वामन दैत, बाळकृष्ण दैत यांचा समावेश आहे.

पिके कुजण्याची भीती जिल्ह्यात सुमारे ६४ हजार हेक्टरवर भात लागवड केली आहे. त्यातील हळव्या बियाण्यांची म्हणजे १०५ ते ११० दिवसांनी तयार होणारी बियाण्याची लागवड सुमारे २० हजार हेक्टरवर आहे. त्यातील तीस टक्के भात कापणीला आली आहेत. गेले आठवडाभर पावसाने म्हणावी तशी उघडीप दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. काही ठिकाणी तयार झालेले भात आडवी झाली असून पावसामुळे ती पुन्हा कुजण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com