कापडण्यात कांद्याला फटका

कापडणे, जि. धुळे : पावसाळ्यात सलग तीन महिने पाऊस झाल्याने कांद्याचे रोप हाती आले नाही. कांदा क्षेत्र अल्प होते.
damage the onion in the Kapadne
damage the onion in the Kapadne

कापडणे, जि. धुळे : पावसाळ्यात सलग तीन महिने पाऊस झाल्याने कांद्याचे रोप हाती आले नाही. कांदा क्षेत्र अल्प होते. खरिपानंतर कांदा बियाण्यांची उगवणक्षमता अवघी २० ते ३० टक्के होती. परिणामी महागडे रोप घेण्यापेक्षा शेतकऱ्यांनी ‍कांदा बियाण्याची थेट पेरणी केली. तरीही उगवणीवर परिणाम झाला.

एकरभर क्षेत्रात केवळ २०-२५ क्विंटल कांद्याचा उतारा बसला. भाव असूनही कांदा परवडत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आता कांदा हबमध्येच कांद्याचा तुटवडा भासत आहे. 

क्षेत्र घटले 

जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामापासून कांद्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अतिपावसाने खरिपात कांद्याचे उत्पादन २० टक्के आले नाही. रब्बीत कांदा बियाण्याची उबवणक्षमता अवघी २० ते ३० टक्केच होती. परिणामी कांद्याची लागवड घटली. सध्या कांदा काढणी सुरू झाली आहे. मात्र एकरी उत्पादन प्रतिक्विंटल २० ते २५ निघत आहे. 

भाव चांगला; उत्पादन कमी 

सध्या कांद्याचे दर बऱ्यापैकी आहेत. मात्र उत्पादनच कमी असल्याने उत्पादन खर्चही निघणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. उत्पादन अधिक असते, तेव्हा भाव मिळत नाही. भाव असतो तेव्हा उत्पादन घटलेले असते. शेतकऱ्यांसाठी कांदा उत्पादन जुगाराचा खेळ झाला आहे. दरम्यान, खानदेशात कापडणे परिसर कांदा उत्पादनाचे हब समजले जाते. मात्र येथे सध्या कांद्याची टंचाई दिसत आहे. 

कांदा उत्पादनात कधीही फेल ठरलो नाही. मात्र यंदा बियाण्याची उबवणक्षमता आणि वातावरणाचा परिणाम उत्पादनावर झाला आहे.  - संभाजी पाटील, कांदा उत्पादक, कापडणे (जि.धुळे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com