उस्मानाबाद जिल्ह्यात फळपिकांचे, घरांचे नुकसान

उस्मानाबाद : जिल्ह्यातील काही भागात सोमवारी (ता. १३) अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी तुरळक गारपीटीसह आलेल्या पावसाने परांडा, भूम तालुक्यात फळपिकांचे नुकसान केले, तर अनेकांच्या घरावरील पत्रे वादळाने उडून गेले.
Damage to orchards, houses in Osmanabad district
Damage to orchards, houses in Osmanabad district

उस्मानाबाद : जिल्ह्यातील काही भागात सोमवारी (ता. १३) अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी तुरळक गारपीटीसह आलेल्या पावसाने परांडा, भूम तालुक्यात फळपिकांचे नुकसान केले, तर अनेकांच्या घरावरील पत्रे वादळाने उडून गेले. 

प्राप्त माहितीनुसार, उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर, जागजी, उस्मानाबाद शहर, जळकोट, नळदुर्ग, माकणी, शिराढोण, माणकेश्वर, परांडा, जवळा बुद्रुक व आसू या ११ मंडळांत पाऊस झाला. पावसाचा जोर उस्मानाबाद तालुक्यातील उस्मानाबाद शहर मंडळासह परंडा तालुक्यातील परंडा व आसू मंडळात सर्वाधिक होता. मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत उस्मानाबाद शहर मंडळात १६ मिलिमीटर, परंडा मंडळात १७ मिलिमीटर, तर आसू मंडळात १५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उर्वरित मंडळांत दोन ते आठ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. 

सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास उस्मानाबाद शहर परिसरात विजांच्या कडकडाटासह जवळपास दहा मिनिट पाऊस झाला. उस्मानाबाद तालुक्यातील उपळे(मा), वाघोली परिसरात गारपीट झाली. परंडा तालुक्यातील रोहकल परिसरात वादळी वारे व अवकाळी पावसाने रोहकल येथील भारत देशमुख यांची केळीबाग आडवी केली. याच गावातील अनेकांच्या घरावरील टिनपत्रे वादळाने उडून गेल्याने अनेकांचा संसार उघड्यावर आला.  अंतरगांवात गारपीटीमुळे द्राक्षेबाग जमीनदोस्त 

अंतरगांव ( ता. भूम ) येथे सोमवारी ( ता. १३ ) दुपारी साडेतीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. त्यामुळे काढणीस आलेल्या द्राक्ष बागेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

अगोदरच ‘कोरोना’मुळे वाहतुक व बाजारपेठा बंद आसल्याने शेतकरी हताश आहे. अवकाळी पावसाने पीक जमीनदोस्त झआले. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या दुबळा होऊ लागला आहे. अंतरगाव येथील अमोल शेळके यांनी बँकेचे कर्ज काढून अंतरगाव शिवारातील गट नंबर ७३ मधील शेतात दोन एक्कर द्राक्षबाग लागवड केली होती. सोमवारी ( ता. १३ ) दुपारी तीनच्या सुमारास वातावरणामध्ये बदल झाला. वादळी वाऱ्यासह अवकाळी गारांचा जोरदार अर्धा तास पाऊस झाला. त्यामुळे द्राक्ष बागेच्या कडेला लावलेले लोखंडी खांब उपटून पडले. क्षणातच होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे काढणीस आलेली दोन एकर द्राक्षबाग जमीनदोस्त झाली. 

शेळके यांचे ४५ते ५० टन द्राक्षाचे नुकसान झाले. अंतरगाव येथे अनेक शेतकऱ्यांची द्राक्षे बागेतच सडून जात आहेत. कोरोना विषाणूमुळे वाहतूक व बाजारपेठ बंद आहे. त्यामुळे काढणीस आलेले द्राक्ष बागेतच आहेत. नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com