अतिवृष्टीने नुकसान; ३४ हजारांवर अर्ज

गेल्या महिन्यात जिल्ह्यात तीन दिवस पावसाने धुमाकूळ घातला होता. अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर वाहिले. त्यामुळे शेती व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीने नुकसान;  ३४ हजारांवर अर्ज Damage from overheating; 34 thousand applications
अतिवृष्टीने नुकसान;  ३४ हजारांवर अर्ज Damage from overheating; 34 thousand applications

अकोला : गेल्या महिन्यात जिल्ह्यात तीन दिवस पावसाने धुमाकूळ घातला होता. अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर वाहिले. त्यामुळे शेती व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आता नुकसान भरपाईच्या अपेक्षेने पीकविमा कंपनीकडे तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला असून, जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ३४,३३८ शेतकऱ्यांनी नुकसानाबाबत माहिती कळविल्याचे समजते. जिल्ह्यात २० ते २२ जुलै या काळात संततधार पाऊस पडला. काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाला. या पावसामुळे अकोला, बाळापूर, बार्शी टाकळी तालुक्यात नदी-नाल्यांना मोठे पूर वाहिले. या पुरामुळे घरांचे, शेतीचे व उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. यंत्रणांनी दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार ७५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला या आपत्तीचा फटका बसला. १० हजारांवर घरांचे नुकसान झालेले आहे.  प्रामुख्याने गेल्या महिन्यातील अतिवृष्टीने जिल्ह्यात जे एकूण नुकसान झाले त्यापैकी सुमारे ४७२९४ हेक्टर क्षेत्र हे विमा काढलेल्या शेतकऱ्यांचे आहे. या विमा बाधितांची संख्या सुमारे ५३३५० एवढी मोठी आहे. त्यामुळे आॅनलाइन व आॅफलाइन या दोन्ही पद्धतीने जिल्ह्यात आतापर्यंत ३४ हजार ३३८ सूचना दाखल झालेल्या आहेत. यात आॅनलाइन पद्धतीने ८८८६ सूचना तर आॅफलाइन पद्धतीने सुमारे २५६५२ सूचना आल्याची माहिती मिळाली आहे. विमा काढलेल्या १ लाख ९० हजार ५२४ शेतकऱ्यांपैकी ३४,३३८  हजारांवर शेतकऱ्यांनी कंपनीकडे तक्रार अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची माहिती कंपनीच्या प्रतिनिधींकडून गोळा केली जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आलेल्या असून, दुसरीकडे नुकसानीचे पंचनामेही केले जात आहेत.

शेतकऱ्यांना त्रास नुकसानाची माहिती देण्यासाठी विमा कंपनीकडून मोबाइल क्रमांक, तसेच ग्राहक सेवा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला. यावर शेतकऱ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अनेकांचा अपेक्षाभंग होत आहे. कंपनीचे प्रतिनिधी व्यवस्थित माहिती देत नाहीत. दूरध्वनी घेतल्यानंतर माहिती देत नाहीत. 

अकोल्यातून सर्वाधिक तक्रारी शेतकऱ्यांनी अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी तक्रारी दाखल केल्या. यात अकोला तालुक्यातून सर्वाधिक ८,७१० तक्रारी दाखल आल्या आहेत. या शिवाय बाळापूरमध्ये ५३७३, बार्शी टाकळीत ३१८५ तर मूर्तीजापूरमध्ये २२८९, तेल्हारा तालुक्यात १७४२ आणि अकोटमध्ये ८०० शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज दिले आहेत. सर्वात कमी ३० तक्रारी पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com