Agriculture news in marathi Damage from overheating; 34 thousand applications | Agrowon

अतिवृष्टीने नुकसान; ३४ हजारांवर अर्ज

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 ऑगस्ट 2021

गेल्या महिन्यात जिल्ह्यात तीन दिवस पावसाने धुमाकूळ घातला होता. अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर वाहिले. त्यामुळे शेती व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

अकोला : गेल्या महिन्यात जिल्ह्यात तीन दिवस पावसाने धुमाकूळ घातला होता. अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर वाहिले. त्यामुळे शेती व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आता नुकसान भरपाईच्या अपेक्षेने पीकविमा कंपनीकडे तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला असून, जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ३४,३३८ शेतकऱ्यांनी नुकसानाबाबत माहिती कळविल्याचे समजते.

जिल्ह्यात २० ते २२ जुलै या काळात संततधार पाऊस पडला. काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाला. या पावसामुळे अकोला, बाळापूर, बार्शी टाकळी तालुक्यात नदी-नाल्यांना मोठे पूर वाहिले. या पुरामुळे घरांचे, शेतीचे व उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. यंत्रणांनी दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार ७५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला या आपत्तीचा फटका बसला. १० हजारांवर घरांचे नुकसान झालेले आहे. 

प्रामुख्याने गेल्या महिन्यातील अतिवृष्टीने जिल्ह्यात जे एकूण नुकसान झाले त्यापैकी सुमारे ४७२९४ हेक्टर क्षेत्र हे विमा काढलेल्या शेतकऱ्यांचे आहे. या विमा बाधितांची संख्या सुमारे ५३३५० एवढी मोठी आहे. त्यामुळे आॅनलाइन व आॅफलाइन या दोन्ही पद्धतीने जिल्ह्यात आतापर्यंत ३४ हजार ३३८ सूचना दाखल झालेल्या आहेत. यात आॅनलाइन पद्धतीने ८८८६ सूचना तर आॅफलाइन पद्धतीने सुमारे २५६५२ सूचना आल्याची माहिती मिळाली आहे.

विमा काढलेल्या १ लाख ९० हजार ५२४ शेतकऱ्यांपैकी ३४,३३८  हजारांवर शेतकऱ्यांनी कंपनीकडे तक्रार अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची माहिती कंपनीच्या प्रतिनिधींकडून गोळा केली जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आलेल्या असून, दुसरीकडे नुकसानीचे पंचनामेही केले जात आहेत.

शेतकऱ्यांना त्रास
नुकसानाची माहिती देण्यासाठी विमा कंपनीकडून मोबाइल क्रमांक, तसेच ग्राहक सेवा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला. यावर शेतकऱ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अनेकांचा अपेक्षाभंग होत आहे. कंपनीचे प्रतिनिधी व्यवस्थित माहिती देत नाहीत. दूरध्वनी घेतल्यानंतर माहिती देत नाहीत. 

अकोल्यातून सर्वाधिक तक्रारी
शेतकऱ्यांनी अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी तक्रारी दाखल केल्या. यात अकोला तालुक्यातून सर्वाधिक ८,७१० तक्रारी दाखल आल्या आहेत. या शिवाय बाळापूरमध्ये ५३७३, बार्शी टाकळीत ३१८५ तर मूर्तीजापूरमध्ये २२८९, तेल्हारा तालुक्यात १७४२ आणि अकोटमध्ये ८०० शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज दिले आहेत. सर्वात कमी ३० तक्रारी पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत.


इतर ताज्या घडामोडी
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...