सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीने ८०० हेक्टरवर भातपिकांचे नुकसान

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ८०० हुन अधिक भातपिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांचे कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करावे, भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
Damage to paddy crop on 800 hectares due to heavy rains in Sindhudurg district
Damage to paddy crop on 800 hectares due to heavy rains in Sindhudurg district

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ८०० हुन अधिक भातपिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांचे कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करावे, भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

सद्यस्थितीत सहा ते सात हजार हेक्टरवरील भातपीक परिपक्व स्थितीत आहे. जिल्ह्यात १४ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी झाली. अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली. वेंगुर्ला, मालवण, सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, देवगड या तालुक्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका परिपक्व झालेल्या भातशेतीला बसला.

जिल्ह्यातील ५५ हजार हेक्टर भातशेतीपैकी तीन हजार क्षेत्रावरील भातपीक परिपक्व स्थितीत असताना हा पाऊस झाला. त्यामुळे पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोरच आडवे झाले. वेंगुर्ला तालुक्यात अनेक ठिकाणी भातपीक पाण्याखाली राहिले. त्यामुळे ते कुजुन गेले. काही ठिकाणी भातपीक भुईसपाट झाले आहे.

दरम्यान, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भातपिकांचे तातडीने सर्व्हेक्षण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. देवगड तालुक्यातील नंदकुमार घाटे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांची भेट घेऊन देवगड तालुक्यातील ५८ गावातील सुमारे १३० हेक्टर भातपीकांचे नुकसान झाल्याचा दावा केला. तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली.

वेंगुर्ला, दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी देखील यापुर्वीच नुकसान झालेल्या भातशेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी भातकापणीला सुरूवात केली आहे. परंतु, जिल्ह्याच्या काही भागात पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी भातकापणी थांबविली आहे. सद्यस्थितीत पाऊस झाला, तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

देवगड तालुक्यात ४ हजार ५०० हेक्टरवर भातपीक आहे. यातील सुमारे १३० हेक्टर भातपीकांचे नुकसान झाले आहे. सडा भागात फटका बसला आहे. त्यामुळे भातपीक नुकसानीचे सर्व्हेक्षण होणे गरजेचे आहे. - नंदकुमार घाटे, ता.देवगड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com