साताऱ्यात गव्याकडून भातपिकांचे नुकसान

ढेबेवाडी, जि. सातारा : पावसाच्या उघडिपीमुळे वाफ्यातच पडून असलेल्या भातपिकासह नाचणी व वरीचे तरू गव्यांनी फस्त करायला सुरुवात केल्याने विभागातील निवी, कसणीसह आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आता रोप लावणी करायची कशी, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. नुकसानीची मालिका अशीच कायम राहिल्यास त्या परिसरात पडीक क्षेत्र वाढण्याचीही भीती आहे.
Damage to paddy crop from cows in Satara

विभागातील निवी, कसणीसह अनेक गावे सातारा व सांगली जिल्ह्यांच्या सीमेवरील घनदाट जंगलालगत वसलेली असून, वन्यप्राण्यांचा तेथे सतत उपद्रव जाणवतो. हातातोंडाशी आलेली पिके रानडुकरे आणि गव्यांच्या कळपांकडून फस्त केली जात असल्याने अलीकडे तेथील अनेक शेतकऱ्यांनी शेती न करता पोटापाण्यासाठी मुंबई गाठली आहे. पडीक क्षेत्र वाढल्याने सातबाऱ्यावर जमीनदार असलेल्या कुटुंबांवरही दुसऱ्या गावात शेतमजूर म्हणून राबायची वेळ आलेली आहे.

एकीकडे पडीक क्षेत्र वाढत असताना दुसरीकडे तेथील शेतकरी एकत्र येऊन जागत्या पहाऱ्याद्वारे पीक राखणीचा धाडसी प्रयत्न करतानाही दिसत आहेत. मात्र, तरीही डोळा चुकवून वन्यप्राणी शिवारात घुसतच असल्याने शेतकरी हतबल झाल्याचे चित्र आहे. आता तर रोप लागणीपूर्वीच गव्यांनी भात, नाचणी आणि वारीच्या तरवांचे वाफे फस्त करायला सुरुवात केल्याने रोप लागण करायची तरी कशी? असा प्रश्न उभा आहे.

शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डोंगर भागातील हीच प्रमुख पिके असून, लागणीपूर्वी तीन आठवडे त्या-त्या शिवारात तरूचे वाफे केले जातात. यंदा शिवारे व तरवे तयार आहेत; परंतु पावसाने ओढ दिल्याने रोप लावणी रखडली आहे.

भात, नाचणी व वरीच्या वाफ्यातील रोपांची गव्यांनी वाट लावली आहे. वन विभागाकडून शिवारातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होतात; परंतु वाफ्यातील रोपांच्या नुकसानीचे काय? रोपांवरून लागवडीखालील क्षेत्र गृहीत धरून भरपाई मिळायलाच पाहिजे. - मारुती ऊर्फ बाळू पाटील, अध्यक्ष, वन व्यवस्थापन समिती, निवी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com