Agriculture news in marathi, Damage to paddy from wild beasts | Page 2 ||| Agrowon

मंडणगड : जंगली श्वापदांकडून भातशेतीचे नुकसान
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

मंडणगड, जि. रत्नागिरी : शेतात तयार झालेल्या पिकांची जंगली श्वापदांकडून नासाडी होते. त्यांच्या उपद्रवामुळे हाताशी आलेले पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे सर्व रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात होत असल्याने पिकांची राखण करण्यासाठी शेतातच मचाण बांधून शेतकऱ्यांनी दिवसरात्र ठाण मांडल्याचे चित्र आहे.  

मंडणगड, जि. रत्नागिरी : शेतात तयार झालेल्या पिकांची जंगली श्वापदांकडून नासाडी होते. त्यांच्या उपद्रवामुळे हाताशी आलेले पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे सर्व रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात होत असल्याने पिकांची राखण करण्यासाठी शेतातच मचाण बांधून शेतकऱ्यांनी दिवसरात्र ठाण मांडल्याचे चित्र आहे.  

तालुक्यातील तुळशी, पाले, सावरी, कोन्हवली, नायणे, गोठे, बंदरवाडी, शिपोळे, चिंचघर, लाटवण, घराडी, म्हाप्रळ, पेवे, पाचरळ, खाडी व नदीकिनारच्या परिसरात हा श्‍वापदांचा उपद्रव सुरू आहे. तालुक्यात पसवलेली भातपिके काढणी योग्य झाली आहेत. लाल झालेली नाचणी टिपून घरी आणण्याची लगबग सुरू आहे. मात्र रानडुक्कर, वानर, केलटी, पक्षी यांचा शेतात वावर होऊ लागला असून त्यांच्या उपद्रवामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. 

संध्याकाळी सात ते पहाटे चारदरम्यान हा प्रकार घडतो आहे. शेतात उभी केलेली बुजगावणी आता वाढलेल्या पिकांमध्ये गडुप झाली असून, वन्यप्राणी त्यांना जुमानासे झाले आहेत. यावर शेतकऱ्यांनी शेतातच राहण्याचा पर्याय शोधला असून, शेताच्या बांधावर लाकडी मचाणे बांधली आहेत. त्यावर झोपण्यासाठी व्यवस्था केली आहे. आगीला जनावरे घाबरत असल्याने संध्याकाळ झाली की शेतात विस्तव पेटवून आग निर्माण केली जाते. काही ठिकाणी फटाके लावून आवाज करण्यात येत आहे. ठिकठिकाणी पेटते कंदील लटकवण्यात आले असून, त्यातूनही शेताची सुरक्षितता करण्यावर भर देण्यात आला आहे. 

काही भागांत हळवी पिके कापणी सुरू झाली आहे, तर गरवी काही दिवसांत कापणी योग्य होणार आहेत. याबाबत शेतकरी नथुराम कळवणकर म्हणाले, ‘‘शेतात जनावरांचा वावर सुरू असून, पीकही तयार झाल्याने धोका पत्करावा लागतो. मचाणाचा फायदा रात्री आणि दिवसाही होतो. आगीमुळे मानवी वस्ती जवळ असल्याचा भास निर्माण होत असल्याने जंगली जनावरे आपला मार्ग बदलतात.’’

टॅग्स

इतर बातम्या
आंदोलनाचा दणका; केळी पीकविमा...अकोला  ः २०१८-१९ या वर्षात केळी उत्पादक...
ऊस दराबाबत आज कोल्हापुरात बैठककोल्हापूर : यंदाच्या ऊस दरावर सकारात्मक तोडगा...
खरीप पिकांसाठी आठ हजार तर, फळबागांसाठी...मुंबई: राज्यात अवकाळी पावसाने नुकसान...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा कायमपुणे : कोकण, मध्य महाराष्ट्राच्या विविध भागात...
शिवसेनाप्रमुखांचा आज स्मृतिदिनमुंबई  : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा...
पीकविम्यासाठी पुण्यात चौथ्या दिवशीही ...पुणे  ः गेल्या वर्षीचा खरीप पीकविमा न...
ढगातील हिमकणांच्या निर्मितीची प्रक्रिया...एकत्रित प्रकारच्या ढगांमध्ये हवेच्या उभ्या...
किमान तापमानात घसरण, थंडीला सुरुवातमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना,...
सांगली जिल्ह्यात पीकविम्यापासून ८६ हजार...सांगली : जिल्ह्यात ऑक्टोबरमधील पावसाने शेतकरी उद्...
बुलडाण्याचा रब्बी हंगाम जाणार अडीच लाख...बुलडाणा  ः  जिल्ह्याच्या रब्बी...
नुकसानीचा बोजा केंद्रप्रमुख, जिनिंग...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस...
वेतोरेतील दहा हेक्टरवरील कणगरचे नुकसानसिंधुदुर्ग : जुलै, ऑगस्टमधील अतिवृष्टी आणि...
परभणी जिल्ह्यात नऊ हजार ९७१ हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात गुरुवार...
गडचिरोलीत रब्बी मक्‍यावर लष्करी अळीचा...गडचिरोली  ः धानकाढणीनंतर मका लागवड होणाऱ्या...
चौथ्यांदा कांदा रोपे तयार करण्याची वेळनाशिक  : जिल्ह्यात उन्हाळ कांद्याच्या लागवडी...
कापूस उत्पादक प्रकाश पुप्पलवार यांचा...यवतमाळ  ः इंडियन कॉटन असोसिएशन तसेच...
परभणीत हरभरा पीक व्यवस्थापनासाठी २१९...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (...
उमराणे परिसरात चंदनचोरांचा धुमाकूळनाशिक : देवळा तालुक्यातील उमराणे येथे व परिसरात...
बाजार समितीला पर्यायी व्यवस्था देऊन...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बाजार समित्या...