Agriculture news in marathi Damage panchnama started in Sindhudurg | Page 3 ||| Agrowon

सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 जुलै 2021

सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. घरे, गोठे, दुकाने, इमारतीसह भात शेतीचे मोठे नुकसान पुरामध्ये झाले आहे.

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. घरे, गोठे, दुकाने, इमारतीसह भात शेतीचे मोठे नुकसान पुरामध्ये झाले आहे. काही भागाला पुराचा मोठा तडाखा बसला आहे. शेतकरी, व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. 

जिल्ह्यात गुरुवारी (ता.२२) ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि संपूर्ण जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. जिल्ह्यातील अनेक बाजारपेठांमध्ये पुराचे पाणी घुसले होते. खारेपाटण, बांदा, कुडाळ, आंबेडकरनगर, मुसरे, कलमठ यासह जिल्ह्यातील विविध भागामधील बाजारपेठांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. काही शहरांमधील इमारतीचा एक मजला पाण्याखाली गेला होता. या शिवाय खारेपाटण, बांदा, केळुस, मसुरे यासह अनेक ठिकाणी शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली होती.

अतिवृष्टीने घरे, गोठ्यांसह कित्येक इमारती कोसळल्या आहेत. पुरामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. परंतु प्रशासन पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविणे, त्यांना प्राथमिक मदत करणे या कामात गुंतलेले होते. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले नव्हते. परंतु गेले दोन तीन दिवस पावसाचा जोर कमी झाला आहे. जनजीवन पूर्वपदावर आले असून, आता प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम हाती घेतले आहे. 

गावागावातील तलाठी, कृषी सहाय्यक घरे, गोठे, शेतीच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करीत आहेत. पुरामुळे खारेपाटण परिसरातील आणि खाडी किनाऱ्याच्या गावांतील शेकडो एकर भातशेती कुजली आहे. पुराचा सर्वाधिक फटका या भागातील भातशेतीला बसला आहे.

येथील २५ हून अधिक गावातील शेतीचे नुकसान झाले आहे. या शिवाय केळुस, तुळस, बांदा, मसुरे परिसरातील देखील कित्येक एकर भातशेती कुजली आहे. सलग दुसऱ्या वर्षी पुराच्या पाण्यामुळे भातशेती कुजल्यामुळे या भागातील शेतकरी निसर्गापुढे हतबल आहे. 

वैभववाडीत मुसळधार पाऊस 
गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. रविवारी (ता. २५) दिवसभर पावसाच्या हलक्या सरी पडल्या. रात्री वैभववाडी तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. तालुक्यात सर्वाधिक ९८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी (ता. २६) सकाळपासून पावसाचा जोर पुन्हा कमी झाला आहे. 

 


इतर बातम्या
नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्त...नांदेड : जिल्ह्यात जुले, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये...
जळगावातील धरणांत ८० टक्के उपयुक्त...जळगाव ः जिल्ह्यात पावसाने आतापर्यंत लावलेल्या...
ऊसबिलाचे तुकडे पाडू  दिले जाणार नाहीत...सातारा : ऊसबिलाचे तुकडे पाडू दिले जाणार नाहीत,...
'लासलगाव'च्या कांद्याला टपाल पाकिटावर...नाशिक : कांदा पिकासाठी लासलगाव परिसराची राष्ट्रीय...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
‘येलदरी’च्या १०, ‘सिद्धेश्‍वर’च्या १२...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२...
‘मांजरा’ ४२ वर्षांत पंधरा वेळा भरलेलातूर ः लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या...
परभणी : ‘ई-पीक पाहणी’वर ७७ हजार...परभणी ः ‘‘ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे यंदाच्या...
पुण्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात...
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
साताऱ्यात ई-पीक पाहणीस अल्प प्रतिसाद सातारा : सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस...
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...
‘पीएम किसान’, ‘ई-पीक’चा तिढा सुटलापुणे ः महसूल व कृषी खात्यात तयार झालेल्या...
बुलडाण्यात ७४ टक्के शेतकऱ्यांना मिळाले...बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित...
नांदेड : पीकविमा कंपनीच्या विरोधात धरणे...नांदेड : मुखेड तालुक्यात इफ्को टोकियो पीकविमा...
जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार...
अकोला : पावसामुळे सोयाबीन, कापूस...अकोला : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर या भागात...