Agriculture news in marathi Damage to rainfed crops in sinnar taluka | Agrowon

सिन्नर तालुक्यात गारपिटीच्या तडाख्यात पिकांचे नुकसान 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 एप्रिल 2020

नाशिक : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात दातली, तर दक्षिण भागात गोंदे, माळवाडी, चापडगाव परिसरात अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीमुळे गहू, हरभरा, कांदा, मका,भाजीपाला यांसह डाळिंब बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर अडचणीत असलेला शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

नाशिक : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात दातली, तर दक्षिण भागात गोंदे, माळवाडी, चापडगाव परिसरात अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीमुळे गहू, हरभरा, कांदा, मका,भाजीपाला यांसह डाळिंब बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर अडचणीत असलेला शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

अवर्षणग्रस्त सिन्नर तालुक्यातील शेतकरी मागील वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीत होरपळला असताना खरिपातील पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली होती. त्यात आता रब्बी हंगामातील पिके चांगली काढणीसाठी आली असताना अवकाळीच्या तडाख्यात सापडली आहेत. दुपारनंतर साडेचारच्या दरम्यान अवकाळी वादळीवाऱ्यासह पाऊस सुरू झाला व त्यानंतर गारपीट झाली. या गारा सुपारीच्या आकाराच्या असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. 

त्यामुळे काढणीसाठी आलेल्या पिकांचे नुकसान झाले. मृगबहारासाठी धरलेल्या डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने गहू, हरभरा, भाजीपाला पिके जमीनदोस्त झाली. काढणीस आलेल्या कांद्याची पात व उन्हाळ मक्याची पाने तुटून पडली. मोठ्या अडचणीत असलेला शेतकरी या नुकसानीमुळे आर्थिक कोंडीत सापडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन शासनाकडून तातडीने मदत मिळावी व दिलासा द्यावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

सटाणा तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट 
निताने, बिजोते, आखतवाडे व भुयाने परिसरात तुरळक पाऊस तर थोडीफार गारपीट झाली. त्यामुळे वर्षभर सुरू असलेला निसर्गाच्या लहरीपणाचा फटका कायम आहे.त्यामुळे काढलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली. 
 


इतर ताज्या घडामोडी
जी.  आर. चिंताला यांनी ‘नाबार्ड’च्या...मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ...
जळगाव जिल्ह्यात मका, ज्वारी खरेदीसाठी...जळगाव : जिल्ह्यात शासकीय केंद्रात हमीभावात मका व...
कापूस खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढवा...जळगाव : शासकीय कापूस खरेदीला गती देण्यासाठी...
शेतकऱ्यांनो पीक कर्जाबाबत निश्चित राहा...नाशिक : ‘‘महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १७ लाख...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नांदेडमध्ये पीककर्जाच्या ऑनलाइन...नांदेड : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील...
इंदापुरात मका खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी...पुणे ः इंदापूर तालुका कृषी उत्पत्र बाजार...
थकीत एफआरपी द्या ः बळीराजा शेतकरी संघटनासातारा : कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले...
जालन्यातील ७६२ तूर उत्पादकांना...जालना : जिल्ह्यातील सहा हमी दर खरेदी केंद्रांवरून...
अमरावतीत २५ जिनींगव्दारे कापूस खरेदीअमरावती ः खरिपाच्या पार्श्‍वभूमीवर कापूस खरेदीला...
सोलापुरात खते, बियाणे थेट शेतकऱ्यांच्या...सोलापूर : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना थेट...
पुणे बाजार समिती उद्यापासून सुरू होणारपुणे ः कोरोना टाळेबंदीमुळे गेली सुमारे दीड...
चांदोरीत शॉर्टसर्किटमुळे १० एकर ऊस खाक चांदोरी, जि. नाशिक : निफाड तालुक्यातील चांदोरी...
बाजार समित्यांनी सीसीआयला मनुष्यबळ...वर्धा ः सीसीआयकडे आवश्‍यक ग्रेडर कमी आहेत....
औरंगाबादमध्ये खरिपातील बियाणे विक्री...औरंगाबाद : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजना सुरूच...पुणे : गटशेती तसेच फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या...
कृषी निविष्ठा बांधावर उपलब्ध करुन द्या...पुणे ः खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे व खते...
माॅन्सूनपूर्वी करा कापसाची खरेदी ः...अमरावती ः वरुड तालुक्‍यात लॉकडाऊनमुळे सीसीआय तसेच...
टोळधाडबाधीत क्षेत्रातील मदतीचे प्रस्ताव...अमरावती ः जिल्ह्यात टोळधाडीच्या झुंडीने केलेल्या...
ताकारी योजनेचे पाणी चिखलगोठणला पोहोचलेसांगली ः ताकारी उपसा जलसिंचन योजनेच्या सुरू...