Agriculture news in marathi Damage to sugarcane again due to untimely strike in Malegaon, Satana taluka | Agrowon

अवकाळीच्या तडाख्यात शेवग्याचे पुन्हा नुकसान

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

नाशिक : गत जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कसमादे भागातील शेवगा लागवडी मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्याने नुकसान झाले होते.

नाशिक : गत जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कसमादे भागातील शेवगा लागवडी मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्याने नुकसान झाले होते. त्यातून शेतकरी सावरले. तोच गत सप्ताहात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे मालेगाव व सटाणा तालुक्यातील शेवगा लागवडीत मोठ्या प्रमाणात फूलगळ झाली. झाडे उन्मळून पडली. पावसामुळे शेंगा लाल पडल्या. सलग दोन महिन्यात झालेल्या अवकाळीमुळे शेवगा उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत. 

नैसर्गिक धोके वाढत असल्याने मालेगाव, सटाणा, देवळा या तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेवगा पिकाकडे मोर्चा वळविला. त्यातून क्षेत्राचा विस्तारही झाला आहे. मालेगाव तालुक्यातील दुष्काळी भागात लागवडी अधिक होत आहेत. मात्र या अस्मानी संकटांमुळे शेतकरी वर्ग धास्तावला आहे. अवकाळी पाऊस व गारांच्या तडाख्यात फांद्या व शेंगांना फटका बसला. मोठ्या प्रमाणावर जखमा दिसून येत आहेत. 

हिवाळी बहरातील तयार माल काढणीच्या अंतिम टप्प्यात आहे. मात्र पावसाच्या मारामुळे शेंगा लाल पडल्याने प्रतवारी घसरली आहे. त्यामुळे उत्पादन घटल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक शेतकरी दुबार छाटण्या तयारीत आहेत. 

‘उत्पादनावर परिणाम; पुरवठ्यात घट’ 

सध्या दव पडत असल्याने तयार शेंगा लाल पडत आहेत. त्याचा परिणाम दरावर होत आहे. मालाचा तुटवडा असून बाजारात सध्या मागणी असूनही पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे चांगली प्रतवारी असलेल्या शेंगांना प्रतिकिलो ५० ते ६०रुपये दर मिळत आहे, असे पवारवाडी (ता. मालेगाव) येथील शेतकरी महेश पवार यांनी सांगितले. 

सध्या उन्हाळी बहर धरला होता. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे शेंगा, फूलगळ झाली आहे. त्यामुळे आगामी नियोजन कोलमडले आहे. 
- देविदास देवरे, शेतकरी, वडगाव, ता. मालेगाव.

जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात दोनदा झालेल्या अवकाळीमुळे नुकसानीचे प्रमाण वाढले. सरकारने शेवगा पिकाला देखील पीक विमा योजनेत सहभागी करून घ्यावे. शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. 
- मनोहर खैरनार, शेतकरी, डोंगराळे, ता. मालेगाव.
 


इतर ताज्या घडामोडी
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
डाळिंब अंबिया बहरातील कीड- रोग...डाळिंब बागेत विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...
पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी...पुणे : गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा...
कोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन...नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती...
पालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून...