नाशिक जिल्ह्यात जिल्हाबंदीमुळे कोट्यवधींच्या भाजीपाल्याचे नुकसान

दरवर्षी दोन पैसे अधिक मिळतात असल्याने उन्हाळी हंगामात भाजीपाला पिके घेतो. मात्र, जिल्हाबंदीमुळे विक्रीत अडचणी आहेत. सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावे. - श्रावण भोरकडे, भाजीपाला उत्पादक, पिंपळगाव जलाल, ता.येवला.
Damage to vegetables worth crores of rupees due to district ban in Nashik district
Damage to vegetables worth crores of rupees due to district ban in Nashik district

नाशिक : नेहमीच दुष्काळग्रस्त असलेल्या येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड केली. भाजीपाला काढणीवेळी कोरोनामुळे जिल्हाबंदी झाली. त्यामुळे नगर जिल्ह्याच्या सीमेलगतच्या गावातील शेतकऱ्यांपुढे शेतमाल विक्रीचा प्रश्न निर्माण झाला. अनेकांनी तेथील प्रशासनाला विनवण्या केल्या. मात्र, सहकार्य न झाल्याने येथील शेतकऱ्यांना काढणीला आलेला ७० टक्के शेतमाल फेकून दयावा लागला. त्यामुळे कोट्यवधीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल, उंदिरवाडी, देवळाणे, बोकटे, अंदरसुल, आडगाव चोथवा यासह परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजीपाला लागवड आहे. येथील शेतकऱ्यांची बाजारपेठ नगर जिल्ह्यातील कोपरगाव आहे. मात्र, जिल्हाबंदीमुळे तो बाजारात विकता आला नाही. एकीकडे येवल्याला शेतमाल विकला, तरी कमी दरात शेतमाल व्यापाऱ्यांच्या हाती द्यावा लागला. येवला शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने दोनच दिवस भाजीपाला विक्रीसाठी होते. दरम्यान शेतमाल इतर दिवशी येवल्यातही विकता येईना. तसेच जिल्हाबंदीमुळे तो कोपरगावलाही नेता येईना. त्यामुळे 'इकडे आड अन तिकडे विहीर'अशी शेतकऱ्यांची स्थिती झाली. 

शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार, कृषी निविष्ठा खरेदी, शेतमाल विक्री व इतरही विविध कामे कोपरगावमध्ये आहेत; मात्र तेथील अंचलगाव शिवारातील चेक पोस्टवर पोलिस यंत्रणा नाशिक जिल्ह्यातील एमएच १५ क्रमांक असलेल्या वाहनांना अजूनही कोपरगावात जाण्यास मज्जाव करत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. सरकार शेतकऱ्यांसाठी शिथिलता आणल्याचे सांगत असले, तरी शेतकरी भरडला जातोय, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले. 

नगर जिल्ह्यातील काही भाजीपाला वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या वाहन चालकांनी विक्री करून देण्याचे सहकार्य दाखवले. मात्र,वाहन भाडे ७०० ते ८०० रुपये असताना ते १८०० रुपयांपर्यंत आकारले. नंतर भाजीपाला विक्री झाली. मात्र, दर पाडून खरेदी केली. त्यामुळे दोन्ही बाजूने शेतकऱ्यांची लुटच झाली. 

भाजीपाला लागवड स्थिती 

सर्वसाधारण भाजीपाला क्षेत्र १५० एकर 
पालेभाज्या कोथिंबीर, मेथी 
फळभाज्या दोडके, भेंडी, कारले, वांगी, ढोबळी मिरची, गवार 

कोपरगावात भाजीपाला विक्रीसह दवाखान्याच्या कामांसाठी नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, कोपरगावचे तहसीलदार, नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना संपर्क केला. मात्र, त्यांनी मदत तर दूरच सकारात्मक प्रतिसाद सुद्धा दिला नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.  - मकरंद सोनवणे, संचालक, बाजार समिती, येवला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com