Agriculture news in marathi, Damaged affected area in Marathwada on 35 lakh hectares | Agrowon

मराठवाड्यात नुकसान बाधित क्षेत्र ३५ लाख हेक्‍टरवर

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 ऑक्टोबर 2021

औरंगाबाद : मराठवाड्यात हाहाकार माजविणाऱ्या अतिवृष्टीमुळे ऑगस्ट ते ऑक्‍टोबर २०२१ दरम्यान ४४ लाख ९७ हजार ४९० शेतकऱ्यांचे जवळपास ३५ लाख १४ हजार ६३५ हेक्‍टरवरील शेतिपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात हाहाकार माजविणाऱ्या अतिवृष्टीमुळे ऑगस्ट ते ऑक्‍टोबर २०२१ दरम्यान ४४ लाख ९७ हजार ४९० शेतकऱ्यांचे जवळपास ३५ लाख १४ हजार ६३५ हेक्‍टरवरील शेतिपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यापैकी जवळपास ३४ लाख ९८ हजार ३५७ हेक्‍टरवरील ९९ टक्‍के नुकसानीचे पंचनामे उरकल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.

यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांची सत्वपरीक्षा घेणाराच ठरला आहे. पावसाच्या लहरीपणाचा कळस अनुभवणाऱ्या मराठवाड्यात यंदा पेरण्याही टप्प्याखालीच झाल्या. त्यातही उस्मानाबाद, जालना व बीड वगळता एकाही जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राचा तुलनेत पूर्ण पेरणी झालीच नव्हती. मराठवाड्यात यंदाच्या खरिपासाठी आठही जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्र ४९ लाख ४२ हजार २९ हेक्‍टर होते. त्यापैकी प्रत्यक्षात ४७ लाख ६५ हजार ७८ हेक्‍टरवर पेरणी झाली.

सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत जवळपास १ लाख ७६ हजार हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणीच झाली नाही. हिंगोली जिल्ह्यात ८० टक्‍के, परभणी ९३, नांदेड ९९, लातूर ९०,औरंगाबाद ९८ टक्‍के, जालना जिल्ह्यात १०१ टक्‍के, बीड १०० टक्‍के , तर उस्मानाबाद जिल्ह्यात १०३ टक्‍के पेरणी झाली होती. जून ते जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीत नुकसानीचा प्राथमिक अंदाज १ लाख १६ हजार हेक्‍टरजवळ होता. त्याचे पंचनामे सुरू असतानाच जून ते सप्टेंबर दरम्यान ३५ लाख ६४ हजार शेतकऱ्यांच्या २५ लाख ९८ हजार २१३ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आला.

त्यानंतरच्या प्राथमिक अंदाजानुसार ऑगस्ट ते ऑक्‍टोबर २०२१ पर्यंत ४४ लाख ९७ हजार ४९० शेतकऱ्यांचे अंदाजे ३५ लाख १४ हजार ६३५ हेक्‍टर पिकांचे नुकसान झाले. त्यापैकी ३४ लाख ९८ हजार ३५७ हेक्‍टरवरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. औरंगाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद या जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. जालना जिल्ह्यातील नुकसानीचे ९७ टक्‍के, तर बीड जिल्ह्यातील ९९ टक्‍के पंचनामे झाले.
 


इतर बातम्या
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
आता तुम्हीच शोधा  कुठला कारखाना कुणी... पुणे : गेल्या पंधरा वर्षांत ६५ सहकारी साखर...
स्वाभिमानी-कारखानदार संघर्ष अटळ;  ‘...सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू, गुरुदत्त,...
पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार  सुरू...पुणे : कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून...
सोयीच्या लोकांची प्रकरणे  सोमय्या झाकून...पुणे : राज्यात एकूण ४३ कारखान्यांची विक्री...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
नगर जिल्ह्यात रब्बीची  सहा टक्के पेरणी  नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत रब्बीची ६...
रब्बीत यंदाही राहणार  हरभऱ्याचाच...अकोला : लवकरच रब्बीची लागवड सुरू होत आहे. या...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
धुळे जिल्हा बँकेत तिघे जण बिनविरोधधुळे ः धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेची १७ जागांसाठी...
सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या ...बुलडाणा : विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील कापूस,...
`तंत्रज्ञान पोहोचविण्यात कृषी...हिंगोली  ः ‘‘कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान...
नांदेड जिल्ह्यात ग्रामबीजोत्पादनात सात...नांदेड : जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी सहा हजार ३१...
यवतमाळ :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ...आर्णी, यवतमाळ : परतीच्या पावसाने खरीप पिकांची...