गोदावरी पाटबंधारे कार्यालयात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पुन्हा ‘ठाण’

भूसंपदनाविषयी व इतर मागण्यांविषयी जोवर निर्णय होत नाही, तोवर कार्यालयातून न उठण्याची भूमिका जालना जिल्ह्यातील निम्न दुधना प्रकल्पाचा नुकसानग्रस्त शेतकाऱ्यांपैकी वांजोळा गावातील शेतकऱ्यांनी घेत गुरुवारी (ता. १२) गोदावरी पाटबंधारे कार्यालयातील संचालकांच्या दालनासमोरच रात्र काढली.
Damaged farmers relocate to Godavari Irrigation Office
Damaged farmers relocate to Godavari Irrigation Office

औरंगाबाद : भूसंपदनाविषयी व इतर मागण्यांविषयी जोवर निर्णय होत नाही, तोवर कार्यालयातून न उठण्याची भूमिका जालना जिल्ह्यातील निम्न दुधना प्रकल्पाचा नुकसानग्रस्त शेतकाऱ्यांपैकी वांजोळा गावातील शेतकऱ्यांनी घेत गुरुवारी (ता. १२) गोदावरी पाटबंधारे कार्यालयातील संचालकांच्या दालनासमोरच रात्र काढली. शुक्रवारही आंदोलन सुरू होते. हातातोंडाशी आलेला पिकाचा घास हिरावणाऱ्या निम्न दुधना प्रकल्पाच्या पाण्यामुळे नुकसान होणाऱ्या जालना जिल्ह्यातील मंठा व परतूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. ११) गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयात कार्यकारी संचालकांच्या कार्यालयासमोर पुन्हा ठाण मांडले होते. या आधीही ऑक्टोबरअखेर शेतकऱ्यांनी त्यांच्या न्याय मागण्यांसाठी गोदावरी पाटबंधारे कार्यालयात ठाण मांडले होते.  माहितीनुसार जालना जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील निम्न दुधना प्रकल्पाचा पाणीसाठा ७० टक्‍क्‍यांवर गेला, की अधिग्रहीत न केलेल्या प्रकल्पाच्या काठावरील जमिनीत पाणी घुसते. या घुसणाऱ्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक हिरावले जाते. हिरावलेल्या या पिकाची भरपाई मागितली, की २५०० ते ६००० रुपये एकरी नुकसानभरपाई देऊन शासन, प्रशासन मोकळे होते. त्यामुळे आधीच प्रकल्पासाठी जमिनी संपादित होताना तुटपुंजा मोबदला मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या भूसंपादित न केलेल्या जमिनीतील उभ्या पिकांचे प्रकल्पातील पाणी वाढल्यानंतर नुकसान होत असल्याने जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.  मंगरूळ, हातवण, नानसी, वांजोळा, श्रीधर जवळा आदी गावांतील साडेतीनशे हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिके प्रकल्पातील पाणी वाढले, की जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. २०१६पासून आतापर्यंत प्रकल्प ७० टक्‍क्‍यांच्या पुढे गेल्याने पीक हातचे गेले आहेत. या संदर्भात अनेकदा आंदोलने करूनही न्याय मिळत नसल्याने गुरुवारी (ता. ११) पुन्हा गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयावर धडक देत हलगी वाजवत ठाण मांडले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com